पुणे

धुळ स्नानामुळे प्रवाशांना श्वसनाचा त्रास,,, कोल्हार - लोणी रस्त्याच्या कामाची बेफिकिरी

CD

KLH26A04230
कोल्हार : लोणी ते कोल्हार रस्त्यावरील धुळीचे लोटात मार्ग काढणारी वाहने.

कोल्हार - लोणी रस्त्यावरील
धुळीमुळे प्रवाशांना श्‍वसनाचा त्रास

कोल्हार, ता. १५ : कोल्हार ते लोणी रस्त्याच्या कामातील उडणाऱ्या धुळीच्या लोटामुळे नागरिकांना श्‍वसनाचा त्रास सुरू झाला आहे. धुळीचा त्रास होऊ नये म्हणून रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
नांदूर शिंगोटे, तळेगाव दिघे, लोणी, कोल्हार या अंदाजे ३७ किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. त्याअंतर्गत कोल्हार ते लोणी या नऊ किलोमीटर रस्त्याचे काम रडतखडत सुरू आहे. पुलांच्या व मोऱ्यांच्या कामावर अद्याप डांबरीकरण झालेले नाही. रुंदीकरणाला अपेक्षित वेग नाही. रस्त्याची ठिकठिकाणी खोदाई करून ठेवली आहे; परंतु प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पुरेसे खबरदारीचे उपाय केले नाहीत. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रयतच्या  हायस्कूल जवळील पुलाचे काम सुरू असले तरी त्या कामाला म्हणावी तेवढी गती नाही. पर्यायी रस्त्याने वाट वाकडी करून ये-जा करावी लागते. नांदूर - शिंगोटे ते लोणीपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची गती असमाधानकारक आहे.
--------------
कोल्हार गावही हैराण
अतीरहदारीच्या रस्त्या प्रमाणे अहिल्यानगर- कोपरगाव रस्त्यालगतचे  दुकानदार व रहिवासी पुरते हैराण झाले आहेत. लोणीला विविध संस्थांमध्ये ये-जा करणाऱ्या प्रवाशांची व विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रस्त्याची खोदाई व वाहने चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात घडू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाना पाटेकरांनी सिंहगडाच्या पायथ्याशीच फार्महाऊस का बांधलं? पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं कारण, म्हणालेले- इथून महाराजांचे...

Akola District Drought : दुष्काळाच्या झळा; लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात! पाणी आणि चाऱ्याअभावी पशुपालक हवालदिल; म्हशी विकण्याची वेळ

Latest Marathi News Update : मसाल्यांमध्ये रंगांचा वापर चालणार नाही- तुकाराम मुंढे

Indian Army Alert: भारतात घुसण्यासाठी 500 दहशवादी रेडी! 'पीओके'मध्ये लपून बसल्याची माहिती; लष्कराकडे महत्त्वाचे इनपुट्स

US Work Permit Rules: ट्रम्प यांचा भारतीयांना मोठा झटका! वर्क परमिट संपल्यावर नोकरी जाणार?

SCROLL FOR NEXT