पुणे

निर्मल घोष यांच्यावर जमावाचा हल्ला

CD

कोलकाता, ता. १४ (पीटीआय) : ‘आर. जी. कर’ प्रकरणातील महिला डॉक्टरवर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात कथितरित्या सहभागी असल्याबद्दल ओडिशातून अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे माजी आमदार निर्मल घोष यांच्यावर शुक्रवारी पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्याबाहेर जमावाने हल्ला केला. खरदह पोलिस ठाण्याबाहेर सुरक्षा कर्मचारी घोष यांना न्यायालयात हजर करण्यासाठी कारागृहाच्या वाहनाकडे घेऊन जात असताना जमावाने त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिस बंदोबस्तात असलेल्या घोष यांच्या डोक्यावर हेल्मेट घातले होते, तरीही संतप्त जमावाने घोष यांच्यावर चपला, अंडी आणि चिखल फेकला. दरम्यान न्यायालयातही घोष यांना तेथे प्रतीक्षा करत असलेल्या दुसऱ्या जमावाने ‘चोर, चोर’ अशा घोषणा देऊन लक्ष्य केले. पोलिसांनी घोष यांना तातडीने न्यायालयाच्या कोठडीत नेले.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी संजीव मुखर्जी यांनाही अशाच प्रकारच्या संतप्त जमावाला सामोरे जावे लागले. पीडितेच्या कुटुंबाचे शेजारी आणि पानीहाटी नगरपालिकेचे माजी तृणमूल काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या मुखर्जी यांना पोलिस कर्मचारी न्यायालयात नेण्यासाठी वाहनाकडे घेऊन जात असताना जमावाने त्यांच्यावरही हल्ला केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT