पुणे

शिवेंद्रराजे ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास

CD

कोंढवली पाणीपुरवठा योजनेसाठी ८५ लाख

अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता

सातारा, ता. ३० ः धोम प्रकल्पांतर्गत कोंढवली (लिंब) या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुर्नवसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास विशेष बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
कोंढवली या पुनर्वसित गावठाणातील नळ पाणीपुरवठा योजना या नागरी सुविधा कामाच्या २४.८५ लाख एवढ्या अंदाजपत्रकास पुणे विभागीय आयुक्त यांनी प्रशासकीय मान्यता देऊन हा निधी वितरित करण्यात आला होता. मात्र, या निधीमधून सदर योजनेचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या गावातील पाणीपुरवठा योजनेच्या उद्‍भवास पाणी कमी पडत असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या कामासाठी सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्री भोसले व मंत्री पाटील यांच्याकडे केली होती.
त्यांच्या सूचनेनुसार कार्यकारी अभियंता यांनी प्रस्ताव विभागीय आयुक्त (पुणे) यांच्याकडे सादर केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने कोंढवली लिंब येथील नळ पाणीपुरवठा योजनेच्या ८४ लाख ९३ हजार २८२ रुपयांच्या अंदाजपत्रकास विशेप बाब म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे भरीव निधी उपलब्ध झाला असून, कोंढवली येथील पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार आहे. याबद्दल कोंढवली ग्रामस्थांनी मंत्री भोसले व मंत्री पाटील यांचे आभार मानले आहेत.
-----------------------
01986
सातारा ः मकरंद पाटील यांचे अभिनंदन करताना कोंढवली ग्रामस्थ.
------------------------

Supreme Court: मुख्य निवडणूक आयुक्तांना मिळणारे अमर्याद कायदेशीर संरक्षण आता जाणार की राहणार? सर्वोच्च न्यायालयाची...

WPL 2027 चे वेळापत्रक जाहीर! MI vs RCB सामना कधी? मुंबई अन् बडोद्यात रंगाणार सामने

Ambegaon Farmers: आंबेगावातील ११०१ शेतकऱ्यांना मोठा आधार! २ हजार ९५ किलो देशी बियाण्यांचे मोफत वाटप

Pali News: पालीकरांचा नगरपंचायतीवर संघर्ष मोर्चा! आधी विकासाचा हिशेब द्या, मगच घरपट्टी वाढवा; नागरिक आक्रमक

Asaduddin Owaisi: 'एका अब्दुलने मिशीगन जिंकले; आता दुसऱ्याने यूपीत कमाल करून दाखवावी!' ओवैसींना म्हणायचेय काय?

SCROLL FOR NEXT