पुणे

मसूर : कोणेगाव ता.कराड येथील जिल्हा परिषद शाळेला शंभर वर्षे पूर्ण ( खाली व्यक्तींचे मनोगत दिले आहे ते बातमीमध्ये घेणे आवश्यक आहे)

CD

कोणेगावातील झेडपी शाळेची शंभरी

शताब्दी सोहळा उत्साहात; मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम


मसूर, ता. ३ ः कोणेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तब्बल एक शतक पूर्ण झाले. त्या अनुषंगाने शाळेत शताब्दी महोत्सव उत्साहात झाला.

शाळेची १९२६ मध्ये स्थापना झाली. शाळेने अनेकांचे भाग्य बदलले. शताब्दी महोत्सवाला विशेष सत्कारार्थी, आजी- माजी शिक्षक, त्यांचे वारस, सेवानिवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, अधिकारी, सैनिक, उद्योजक, त्यांचे पालक यांचा सत्कार करण्यात आला.
माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. यावेळी पंचायत समिती सदस्य कोमल यादव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम दीक्षित, ॲड. उदयसिंह जगदाळे, जालिंदर जगदाळे, सरपंच रमेश चव्हाण, बाळासाहेब जगदाळे, डॉ. रमेश लोखंडे, डॉ. रमेश जाधव, ग्राहक संघाचे राज्य अध्यक्ष दिलीप पाटील, सतीश चव्हाण, भूषण जगदाळे, गिर्यारोहक मानसिंह चव्हाण यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती आजी-माजी अध्यक्ष, सदस्य उपस्थित होते.
मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ‘‘शाळा विद्यार्थीच घडवीत नाही, तर चांगला समाज निर्मितीसाठीही त्यांचा वाटा असतो. ब्रिटिशांनी १९२६ ला या गावात शाळा सुरू केली अन् गावात फिरणाऱ्या चिमुकल्यांना शिक्षणाचे दरवाजे उघडले गेले. पोरं शिकू लागली अन् समजदार होऊ लागली.’’

संगीता साळुंखे म्हणाल्या, ‘‘शाळेला शंभर वर्षांची समृद्ध परंपरा आहे. यातून विविध क्षेत्र विद्यार्थ्यांनी पादाक्रांत केली आहेत.’’ माजी विद्यार्थ्यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला.
कृष्णत हिरवळे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक संजय नागरे यांनी प्रास्ताविक केले. रशीद तांबोळी यांनी आभार मानले.


B02556
कोणेगाव : शताब्दी सोहळा कार्यक्रमाचे उद्‌घाटन करताना मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, कोमल यादव आदी.
.................................................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT