नहुश गुळवणी आणि निहार कोळपकर
नहुश गुळवणी आणि निहार कोळपकर sakal
पुणे

#KoneHaMaath? : ‘कोणे हा माठ’ अभियान राज्यभरात राबविण्याचा विचार

सकाळ डिजिटल टीम

पुणे पोलिस व शहर वाहतूक शाखेतर्फे वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने सध्या शहरात ‘कोणे हा माठ’ हे अभियान सुरू आहे. त्यास ‘सकाळ माध्यम समूहा’चे सहकार्य लाभले आहे. यासोबतच सोशल मीडियाद्वारे हे अभियान लाखो लोकांपर्यंत पोहोचविण्यात ‘विट अँड चाय मीडिया’ कंपनीचे विशेष योगदान राहिले आहे. ‘विट ॲँड चाय मीडिया’च्या टीममधील नहुश गुळवणी आणि निहार कोळपकर यांच्याशी साधलेला संवाद.

- अनिल सावळे

प्रश्न : ‘विट अँड चाय मीडिया’ कंपनी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे?

उत्तर ः आम्ही ‘विट अँड चाय मीडिया’ कंपनी २०१८ मध्ये एका कॅफेमध्ये सुरू केली. आम्हाला राज्यातील नामांकित ब्रॅंडसह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे ब्रॅंड प्रमोशन करण्याची संधी मिळाली आहे. आमच्या टीममध्ये मोहित घाटे, निकिता कुबेर, शाश्वती पंढरपूरकर, पियुष पोरे, श्रुतिका गडेकर, प्राची पवार, रजत गोवित्रीकर यांच्यासह ४० सुशिक्षित तरुणांची टीम कार्यरत आहे.

आपणांस ‘कोणे हा माठ’ ही संकल्पना कशी सुचली?

आपण शहरात दररोज अनेकजण वाहतुकीचे नियम मोडताना किंवा अपघात होताना पाहतो. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातात लोकांचे बळी जात असल्याच्या बातम्या वाचतो. त्यावेळी केवळ जाहिरात एजन्सी म्हणून काम न करता समाजासाठी आपण नेमके काय योगदान देऊ शकतो? एक पुणेकर दुसऱ्या पुणेकरास वाहतुकीचे नियम चांगल्या पद्धतीने कसे समजावून सांगू शकतो. याबाबत बराच विचार केल्यानंतर आम्हाला ‘कोणे हा माठ’ ही संकल्पना सुचली.

पुणे पोलिस आणि ‘सकाळ’सोबत हे अभियान राबविण्यामागे काय उद्देश होता?

आम्ही लहानपणापासून ‘सकाळ’ वृत्तपत्र वाचत आलो आहोत. ‘सकाळ’ जी बातमी देते त्यावर लोकांची विश्वासार्हता आहे. लोक ते मनापासून ऐकतात. ‘सकाळ माध्यम समूहा’ने वाहतूक जनजागृती आणि इतर विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.

सर्वाधिक खपाचे दैनिक असलेल्या ‘सकाळ’च्या मदतीने हे अभियान यशस्वी होईल याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही पुणे शहर वाहतूक पोलिस आणि ‘सकाळ’सोबत हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला.

हे अभियान पुण्यात यशस्वी होत आहे. यापुढील काळात वाहतूक जनजागृतीसाठी काय योजना आहे?

पुणे पोलिसांच्या पुढाकाराने आणि ‘सकाळ माध्यम समूहा’च्या मदतीने सुरू असलेले अभियान यशस्वी होताना दिसून येत आहे. सुज्ञ पुणेकरांचा अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान इतर प्रमुख शहरांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्याचा विचार आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटणार आहोत. त्यांची परवानगी घेऊन हे वाहतूक जनजागृती अभियान राज्यभर पोचविण्याचा विचार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

Renuka Shahane : 'मराठी लोकांना कमी लेखणाऱ्यांना मत देऊ नका'; त्या घटनेनंतर रेणुका यांनी व्यक्त केला संताप

मराठा समाजातील NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कुणबी आरक्षण न मिळाल्याने एकाने संपवले जीवन

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

SCROLL FOR NEXT