पुणे

कोपर्डे हवेली : ''झाले इलेक्शन जपा रिलेशन'' ची परंपरा कायम

CD

कोपर्डे हवेलीत झाले इलेक्शन, जपले रिलेशन

गावाने परंपरा ठेवली कायम; निकालानंतर विजयी उमेदवाराचा सत्कार

जयंत पाटील : सकाळ वृत्तसेवा
कोपर्डे हवेली, ता. २३ : कऱ्हाड तालुक्यातील छोटेसे व राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून कोपर्डे हवेलीची ओळख आहे. निवडणुकीच्या काळात तीव्र स्पर्धा आणि निकालानंतरची एकजूट ही या गावाची खास ओळख आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही हे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. गटात तीन वेगवेगळ्या पॅनेलचे उमेदवार रिंगणात होते. प्रचारादरम्यान एकमेकांवर जोरदार टीका, टिप्पणी आणि रस्सीखेच झाली. मतदानही चुरशीने व उत्साहात झाले. निकाल लागला, हार-जीतचे चित्र स्पष्ट झाले. मात्र, दुसऱ्याच दिवशी गावही एक झाले. १५ दिवस एकमेकांना विरोधक असणारे गावातील नेते, कार्यकर्ते चहाच्या टपरीवर एकत्र चर्चा करताना दिसून आले.

एकमेकांविरोधात लढलेले उमेदवारही दुसऱ्या दिवशी एकत्र चहा पिताना पाहायला मिळाले. त्याद्वारे ‘झाले इलेक्शन, जपा रिलेशन’ असा संदेश देत गावकरी वैर विसरून पुन्हा एकत्र येत असल्याचे दिसून आले. वर्षानुवर्षे ही परंपरा चालत आहे. या संस्कृतीमुळे गावातील राजकीय वातावरण नेहमीच सकारात्मक राहते. निवडणूक काळात तीव्रता असली, त, निकालानंतर सर्वजण एकमेकांच्या यशात सहभागी होतात. अपक्ष, राष्ट्रवादी, भाजप अशा विविध पॅनेलमधून उमेदवार लढले, तरी गावाची एकजूट अबाधित राहते. राजकीय स्पर्धा असली तरी मानवी संबंध टिकवणे हे आव्हान असते.
..........
चौकट
.........

संस्कृती अन् परंपरा
गेल्या पाच वर्षांपूर्वी कोपर्डे हवेली ग्रामपंचायत निवडणुकीत अमित पाटील यांचा विजय झाला. त्यांच्या विरोधातील उमेदवार रामचंद्र चव्हाण व महेश चव्हाण यांनी अमित पाटील यांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणुकीत अमित पाटील यांना पराभव झाला; परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी विजयी उमेदवार सिद्धार्थ चव्हाण यांच्या घरी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ही संस्कृती, परंपरा कोपर्डे हवेलीचे वेगळेपण दाखवते.

V98183
काेपर्डे हवेली ः विजयी उमेदवार सिद्धार्थ चव्हाण यांचा सत्कार करताना अपक्ष उमेदवार अमित पाटील. त्या वेळी कार्यकर्ते.
.................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ अनिवार्य; बालमृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयांना आदेश!

‘Big Boss’मधून बाहेर पडताच सचिन कुमावतची पहिली पोस्ट; म्हणाला, “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं म्हणजे…”

Explainer : पृथ्वी १६७० किमी प्रति तास वेगाने फिरते, मग आपल्याला हे जाणवत का नाही? विज्ञानाने उलगडलं नवं रहस्य, वाचा A टू Z माहिती

Latest Marathi News Live Update : अजितदादांची ती शेवटची भेट असेल असं वाटलं नव्हतं : मुख्यमंत्री फडणवीस

'अमराठी कलाकारांना पहिल्या रांगेत बसवतात आणि...' सई ताम्हणकरने इंडस्ट्रीबाबत व्यक्त केला राग, म्हणाली...'टीआरपी वाढवण्यासाठी...'

SCROLL FOR NEXT