पुणे

बियाणे बातमी

CD

बोगस बियाण्याच्या ३३ तक्रारी

कोपरगावच्या सर्वाधिक; ३२ हेक्टर क्षेत्र बाधित

अहिल्यानगर, ता. १७ ः तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडे सोयाबीन बियाण्याची उगवण न झाल्याच्या ३३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. समितीने त्याची पाहणी केली आहे. याबाबत अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये ३१ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले आहे. यात ३२.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

यंदाच्या खरीप हंगामात कपाशी व सोयाबीनचा सर्वाधिक पेरा आहे. एकीकडे ‘एल निनो’चा धोका, तर दुसरीकडे गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. त्यात आणखी एक मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील २०, अहिल्यानगर तालुक्यातील ९, श्रीरामपूरमधील २, अकोले व राहाता येथील प्रत्येकी एका तक्रारीचा समावेश आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील सर्व तक्रारी पिंपळगाव माळवी गावातील आहेत. कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड, वेळापूर, वेसगाव, दहिगाव बोलका, भोजडे, डाऊच, चासनळी, मायगाव देवी, माहेगाव देशमुख या गावांचा समावेश आहे. तर श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव, माळवडगाव आणि अकोले तालुक्यातील अंभोळ गावाचा समावेश आहे.
.................
तक्रार समितीची कार्यपद्धती

तालुका तक्रार निवारण समितीमध्ये तालुक्याचे गुणनियंत्रक अधिकारी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे किंवा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कंपनी प्रतिनिधी यांचा समावेश असतो. शेतकऱ्याची तक्रार तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्यावर समिती प्लॉटची पाहणी करते. त्या लॉटचे बियाणे इतर ठिकाणी दिले असल्यास तेथील प्लॉटचीही पाहणी होते. त्यानंतर समितीला तक्रारीत तथ्य आढळल्यास कंपनीविरोधात जबाबदारी निश्चित केली जाते. त्याचा अहवाल तक्रारदार शेतकऱ्याला दिला जातो. त्याआधारे फसवणूक झाली असल्यास शेतकरी ग्राहक पंचायतीकडे दावा दाखल करू शकतो. पाहणीपासून अहवाल येईपर्यंत आठ दिवसांचा कालावधी लागतो.
.................
“शेतकऱ्यांनी बियाण्यांचे पक्के बिल घ्यावे व ते जपून ठेवावे. बियाण्याची बॅग फोडताना खालून फोडावी, जेणेकरून बॅगवरील टॅग सुस्थितीत राहील. बियाणे खरेदी करताना अधिकृत कृषी सेवा केंद्रचालकाकडूनच घ्यावे. कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.”
— सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अहिल्यानगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: 'सीजेपी'च्या आंदोलनामुळे भाजपच्या आणखी एका बड्या नेत्याची खुर्ची गेली; आता 'जेन-झीं'वर विशेष लक्ष?

Hockey World Cup 2026: भारताचा विजय हातातून निसटला! पहिल्या हाफमधील पिछाडीनंतर इंग्लंडने फिरवला सामना

Marathi News Live Updates : पाल फाट्यावर आयशर ट्रकचा भीषण अपघात

'आगरी समाजाचे लोक माजलेत' एकवीरा देवीच्या दर्शनाला गेलेल्या कुटुंबासोबत धक्कादायक प्रकार; हॉटेल चालकाकडून मारहाण, शिवीगाळ अन्...

महाराष्ट्राचा ‘माउंटन मॅन’! पत्नीला रस्त्याअभावी गमावलं; आता पती गावासाठी स्वतःच खोदतोय रस्ता, मांझींची आठवण करून देणारी कहाणी

SCROLL FOR NEXT