पुणे

कोपरगाव जन आक्रोश आंदोलन

CD

KPG26B10559
कोपरगाव ः जनआक्रोश आंदोलन प्रसंगी उपस्थित विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी.

तर यापेक्षा मोठे आंदोलन छेडू
सुनील गंगुले ः कोपरगावमध्ये जनआक्रोश आंदोलन
कोपरगाव, ता. १९ ः खोटे बोलून सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेत सत्ता मिळवली. गोशाळा उभारण्यावरून त्यांच्यात एकमत नाही. मोकाट जनावरांसाठी काढलेल्या टेंडरमध्ये कोण-कोण भागीदार आहेत, याची चौकशी करावी. डुकराच्या धडकेत एकाचा बळी गेल्यानंतर पालिकेने किती डुकरे पकडली, हे जाहीर करावे. मृत्युमुखी पडलेल्या दोघांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई द्यावी. आजचे आंदोलन एक झलक असून, प्रश्न सुटला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिला.
आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष, मनसेचे पदाधिकारी, नगरसेवक, विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग घेतला. तब्बल ५० विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आंदोलक गेले असता, त्यांना नगरपालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडविण्यात आले. मात्र नंतर मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारले.
आंदोलनस्थळी माजी नगरसेवक मंदार पहाडे म्हणाले, डुकराच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले होते. तरी देखील पालिका प्रशासन जागे झाले नाही. त्यानंतर दुसरा बळी गेला. पालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावू म्हणून आश्वासन दिले होते. मात्र निवडून आल्यावर त्यांना त्याचा विसर पडला. केवळ मतांसाठी खोटे आश्वासन दिले का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत मोकाट जनावरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT