पुणे

कोपर्डे हवेली : राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा व लाठीकाठी प्रशिक्षण शिबीर

CD

कोपर्डेत मुला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे

माेफत लाठीकाठी प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ


कोपर्डे हवेली, ता. ११ : गुढीपाडवा व शिवजयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांत आरोग्य जागृती, खेळाडूंचा विकास आणि युवा शक्तीला स्वसंरक्षणाचे शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी गावातील मुला-मुलींसाठी मोफत लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. उद्यापासून (गुरुवार) २२ मार्चपर्यंत माणिक चौक क्रीडांगण येथे दररोज सायंकाळी हे शिबिर हाेईल.
जखिणवाडी येथील प्रशिक्षक स्वप्नील चव्हाण हे प्रशिक्षण देतील. गावातील सिद्धेश्वर व्यायाम मंडळाच्या वतीने दादासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ६५ किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. उद्या (गुरुवार) माणिक चौक मैदानावर सकाळी १२ वाजता स्पर्धा सुरू होईल. शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालय, उंब्रज यांच्या वतीने उद्या ग्रामपंचायत हॉलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर हाेईल. सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत शिबिर हाेईल. नेत्र तपासणी आणि गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात येईल. ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

..........
चौकट
.............
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

लाठीकाठी प्रशिक्षण व नेत्र तपासणी शिबिराचा लाभ केवळ गावातील रहिवासीच घेऊ शकतात. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

GT vs RCB Live: विराट कोहलीने घातला राडा! रजत पाटीदारच्या विकेटवरून संतापला, जेसन होल्डरच्या झेलवरून अम्पायरसोबत वाद Video

RTE Admission Deadline Extended: आरटीई २५ टक्के राखीव प्रवेशांसाठी अंतिम मुदतवाढ; पालकांना ८ मे पर्यंत संधी

Maharashtra Private School Fee Refund: खासगी शाळांना शुल्क परतावा धोरणाच्या दिशेने एक पाऊल; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

सोलापूरच्या पोलिस दलातील ‘या’ १५ अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह! महाराष्ट्र दिनानिमित्त आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव, वाचा...

SCROLL FOR NEXT