Snehlata Pawar
Snehlata Pawar sakal
पुणे

Snehlata Pawar : अपंग भावासाठी निवृत्त शिक्षिका बहिणीची धडपड

जितेंद्र मैड

अपंग असलेल्या आपल्या भावाला वडीलांची पेन्शन मिळावी यासाठी धडपड करणा-या बहिणीला यश मिळाले. त्याचा आनंद तीने सकाळ बरोबर शेअर केला.

कोथरुड - अपंग असलेल्या आपल्या भावाला वडीलांची पेन्शन मिळावी यासाठी धडपड करणा-या बहिणीला यश मिळाले. त्याचा आनंद तीने सकाळ बरोबर शेअर केला.

स्नेहलता पवार या कोथरुडच्या शंकरराव मोरे विद्यालयातून निवृत्त झाल्या आहेत. त्यांचे वडील वायुदलात कारकून होते. वृध्दापकाळाने निधन झाल्यावर त्यांचे निवृत्तीवेतन आईच्या खात्यावर यायचे. आई वारल्या नंतर हे पेन्शन बंद झाले. पवार यांना पाच भावंडे आहेत. त्यातील धाकटा भाऊ हा अपंग आहे. त्याला उपजिविकेसाठी काहीतरी साधन उपलब्ध असावे असे त्यांना नेहमी वाटत होते. त्यातच शासनाचा नवा आदेश त्यांच्या वाचनात आला.

या आदेशानुसार सेवा निवृत्त सैनिकाचे अपंग मुल, विधवा वा घटस्फोटीत मुलगी पेन्शनसाठी पात्र होवू शकते. पवार यांनी आपल्या वडीलांची सर्व कागदपत्रे, भावाची अपंगत्व प्रमाणपत्रे, शासन आदेशानुसार लागणारी विविध कागदपत्रे गोळा करुन निवृत्ती वेतन पात्रतेसाठी अर्ज दाखल केला. त्याचा वेळोवेळी पाठपुरावा सुरु केला. २०१८ पासून सुरु केलेल्या या प्रयत्नाला यश आले. राजेश बापुराव शिंदे, वय ४० यांना सप्टेंबर २०१२ पासूनचे असे १०७५९८० रुपये मिळाले. तसेच आता दरमहा आठ हजार रुपये मिळत आहेत.

अपंग असलेल्या भावाच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलवू शकलो याबद्दल समाधान व्यक्त करताना स्नेहलता पवार म्हणाल्या की, माझे वडील २००४ साली वारले. त्यानंतर आईच्या नावे निवृत्ती वेतन येत होते. आई २०१० ला वारली. त्यानंतर वेतन येणे बंद झाले होते. आम्ही संगणक, इंटरनेट वापरायला नव्याने शिकलो. त्यावर मला या शासकीय आदेशाची माहिती मिळाली. त्याचा मी पाठपुरावा केला. यामध्ये चार वर्षे गेली परंतु भावाला पेन्शन मिळवून देवू शकले याचा आनंद मोठा आहे. ज्या निवृत्त सैनिकाची मुले अपंग, मुली विधवा वा घटस्फोटीत आहेत त्यांना या पेन्शचा लाभ मिळू शकतो.

भावुक झालेले राजेश शिंदे म्हणाले की, भावाच्या सुखासाठी झटणारी बहिण लोककथेत व चित्रपटातच असते असे नव्हे. माझ्या बहिणीने नेहमीच मला आधार दिला आहे. तीचे आभार मानणे तीला आवडणार नाही. पण या वयात सुध्दा तीने माझ्यासाठी जे केले आहे ते अविस्मरणीय आहे. हे उपकार मी कसा फेडू. तीच्या ऋणात राहणेच मी पसंद करेन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT