कोरेगाव भीमा, ता. १२ : कॅन्टीनची वेळ संपल्याने नाश्ता देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका सुरक्षारक्षकाला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील झेडएफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत ही घटना घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शिवराज कृष्णा तोरणे आणि जयदीप दीपक पावसे (दोघेही रा. पेरणे फाटा, ता. हवेली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कैलास नारायण सिंग (वय ३१, सध्या रा. फडतरे वस्ती, कोरेगाव भीमा, मूळ रा. उत्तराखंड) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास सिंग हे झेडएफ कंपनीच्या कॅन्टीनमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर असताना कंपनीतील कामगार शिवराज तोरणे आणि रितेश वाघमारे नाश्ता करण्यासाठी आले. कॅन्टीनची वेळ संपल्याचे सांगून सिंग यांनी नकार दिला असता, दोघांनी स्वतः नाश्ता घेऊन खाल्ला आणि तेथून निघून गेले. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सिंग घरी जात असताना शिवराज तोरणे आणि जयदीप पावसे यांनी त्यांना अडवून शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. मध्यस्थी करणाऱ्या सिंग यांच्या मित्रालाही मारहाण करण्यात आली. तक्रार केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस हवालदार नवनाथ नाईकडे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.