पोलिसांचा बंदोबस्त Sakal
पुणे

पुणे : कोरेगाव भिमा येथे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

एक जानेवारी रोजी विजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भिमा येथे देशभरातून हजारो भाविक येत असतात.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथील विजयस्तंभ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलिस दल (Pune City Police) पाच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करणार आहे. एक जानेवारी रोजी विजस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक येत असतात. तेथे सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होवू नये या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे.

बंदोबस्तासाठी राज्यभरातील विविध पोलिस आयुक्तालय व अधिक्षक कार्यालयातूनही ७०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक मागविण्यात आली आहे. बुधवारी (ता. २९) सायंकाळी राज्याच्या विविध भागातील पोलिस बंदोबस्त पुण्यात दाखल झाला आहे, अशी माहिती विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.

या काळात असणार बंदोबस्त :

गुरुवारी (ता. ३०) सकाळी सर्व पोलिसांना बंदोबस्ताची माहिती देण्यात येणार असून रंगीत तालीम घेण्यात येणार आहे. ३१ डिसेंबरला सायंकाळपासून हा बंदोबस्त सुरु होणार असून तो १ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत राहणार आहे.

बंदोबस्तातील अधिकारी व पथके :

२ अपर पोलिस आयुक्त, ५ पोलिस उपायुक्त, १३ सहायक आयुक्त, ५३ पोलिस निरीक्षक, १३० सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, १९५० अंमलदार, ७०० होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या ४ कंपन्या. १० बॉम्ब शोधक व नाशक पथके, ६ जलद कृती दलाची पथके, ५ दंगल नियंत्रण पथके असा पुणे शहर पोलिस दलाचा बंदोबस्त असणार आहे. याशिवाय नवी मुंबई, मुंबई, सीआयडी क्राईम, महामार्ग पोलिस, पुणे, मुंबई रेल्वे पोलिस, औरंगाबाद, पिंपरी, औरंगाबाद पोलिस आयुक्तालय, नाशिक, पालघर, रायगड येथून २ पोलिस उपायुक्त, ५ सहायक आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ७०० पोलिस अंमलदार असा बंदोबस्त आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT