Koregaon Bhima
Koregaon Bhima 
पुणे

दंगलीपूर्वीचे व्हॉटस्‌ॲप संदेश आयोगासमोर सादर

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरेगाव भीमा येथील दंगलीपूर्वी एक जानेवारी रोजी व्यवहार बंद ठेवावेत, असे संदेश व्हॉटसॲपवर प्राप्त झाल्याचे शरद काळूराम दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी ते संदेश आयोगासमोर सादर केले.

कोरेगाव भीमा दंगलीप्रकरणी उच्चस्तरीय न्यायालयीन समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील साक्षीला सोमवारी सुरवात झाली. न्या. जे. एन. पटेल यांच्या उपस्थितीत साक्ष नोंदविण्यात आली. सुनावणीच्या पहिल्या दिवशी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेल्यांपैकी शरद दाभाडे या व्यक्तीची साक्ष नोंदविण्यात आली.  बचाव पक्षाचे वकील बी. जी. बनसोडे यांनी दाभाडे यांची उलटतपासणी घेतली. त्यामध्ये दाभाडे यांनी व्हॉट्‌सॲप ग्रुपवर आलेल्या संदेशांबाबत ही माहिती दिली. दरम्यान, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना केवळ छायाचित्रांवरून ओळखतो. तसेच, या घटनेशी माझा कोणताही संबंध नसल्याचे दाभाडे यांनी सांगितले. दरम्यान, भारिप- बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे मंगळवारी युक्तिवाद करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जबाब घेण्याबाबत आयोगाला अधिकार
एल्गार परिषदेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेल्या सुधीर ढवळे, हर्षाली पोतदार आणि रमेश गायचोर यांनी आयोगासमोर अर्ज सादर केले आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलिस महासंचालकांना आयोगासमोर बोलावून, त्यांचे जबाब नोंदविण्याची मागणी केली आहे. यावर कोणाचा जबाब कधी घ्यायचा, हे आयोगाला ठरविण्याचे अधिकार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT