Ramdas Athawale Sakal
पुणे

Koregaon Bhima : कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्यदिनी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात - रामदास आठवले

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हे शौर्याचे प्रतीक असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास मानवंदना दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हे शौर्याचे प्रतीक असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास मानवंदना दिली होती.

पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ हे शौर्याचे प्रतीक असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभास मानवंदना दिली होती. त्यानिमित्त दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखो लोक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येतात. याठिकाणी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.

१ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभ विकास कामासंदर्भात केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आठवले यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सरकारी विश्रामगृहात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीत सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), जिल्हा परिषद, महापालिका, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक ग्रामीण यांनी समन्वय साधून शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात उत्कृष्ट नियोजन करावे. भीम अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश आठवले यांनी दिले.

बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी आठवले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. बार्टी संस्थेच्या वतीने २०२२ पासून कोरेगाव भीमा विजयस्तंभ शौर्य दिनाचे नियोजन करण्यात येत आहे. शौर्य दिन व विकास कामांच्या नियोजनाबाबत त्यांनी माहिती दिली.

या आढावा बैठकीला बार्टी संस्थेचे महासंचालक गजभिये, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब साळुंके, उपायुक्त रवींद्र पाटील, सहायक आयुक्त विजय गायकवाड, संगीता डावखर, मनीषा फुले, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, शशिकांत बोराटे, प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्यासह संबंधित अधिकारी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT