पुणे

कोरेगाव नगरपंचायत कर्मचार्‍यांना तीन बोनस!

CD

नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तीन बोनस

कोरेगावात चांदीचे नाणे, साहित्य दिवाळी भेट

कोरेगाव, ता. १२ : येथील नगरपंचायतीतील विविध विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे ८५ कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी अधिक आनंददायी झाली. प्रत्येक कर्मचाऱ्याला एकत्रित २८ हजार रुपये, मागील थकीत दोन पगार, दिवाळी साहित्य किट व पाच ग्रॅम चांदीचे नाणे मिळाले.
दिवाळीमुळे यंदा नगरपंचायतीने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये बोनस, मागील थकीत दोन पगार दिल्याने कर्मचारी आनंदले. यासाठी नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्षा राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक व मुख्याधिकारी प्रताप कोळी यांनी योगदान दिले. नगरपंचायतीचा बोनस मिळाल्याने कर्मचाऱ्यांना सुखद धक्का देत दयानंद भोसले यांनी निमंत्रण देऊन प्रत्येकी ११ हजार रुपये रोख व दीपावली किराणा साहित्याचे किट भेट दिले. यावेळी नगरसेवक हेमंत बर्गे, प्रीतम बर्गे, गणेश धनावडे, अक्षय सतीश बर्गे, अक्षय संजय बर्गे, सयाजीराव बर्गे, दिनेश सणस आदी उपस्थित होते.
येथील हुतात्मा स्मारकात आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी संयुक्तपणे नगरपंचायत कर्मचाऱ्यांना निमंत्रण देऊन तब्बल १२ हजार रुपये दिवाळी भेट, पाच ग्रॅम चांदीचे नाणे व स्नेहभोजन दिले. या वेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, नगराध्यक्षा बर्गे, आजी- माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. या अनोख्या भेटीमुळे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली.

..............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT