Flats and Land Rates Pune Sakal
पुणे

पुण्यात सदनिकांच्या सर्वांत महाग दरात कोरेगाव पार्क आघाडीवर

पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा परिसर निवासी सदनिका घेण्याच्या दृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. मात्र, या परिसरातील मोकळ्या जागेचा दर मात्र कमी आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील कोरेगाव पार्क हा परिसर निवासी सदनिका घेण्याच्या दृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. मात्र, या परिसरातील मोकळ्या जागेचा दर मात्र कमी आहे.

पुणे - शहरातील कोरेगाव पार्क (Koregaon Park) हा परिसर निवासी सदनिका (Flats) घेण्याच्या दृष्टीने सर्वांत महागडा ठरला आहे. मात्र, या परिसरातील मोकळ्या जागेचा (Empty Space) दर मात्र कमी आहे. या उलट उच्चभ्रू वस्तीच्या प्रभात रस्त्यावरील मोकळ्या जमिनींचा दर सर्वाधिक, तर सदनिकांचा दर हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्कमधील सदनिकांचा रेडी-रेकनरमधील (Ready Reckoner) दर प्रति चौरस मीटरसाठी १ लाख ७२ हजार ५८० रुपये आणि मोकळ्या जमिनींचा दर ६१ हजार ४० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर प्रभात रस्त्यावरील सदनिकांचा दर १ लाख ५४ हजार रुपये प्रति चौरस मीटर असून, मोकळ्या जमिनींचा दर हा ८० हजार २८० प्रति चौरस मीटर एवढा आहे.

उंड्री येथील मोकळ्या जमिनींचा दर सर्वात कमी असून तो ४ हजार ५०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. तर धानोरी येथील सदनिकांचा दर सर्वांत कमी म्हणजे २७०० रुपये प्रति चौरस मीटर इतका आहे. महापालिका क्षेत्रासाठी रेडी-रेकनरचे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात सरासरी ८.१५ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. ही वाढ करताना या परिसरांत मागील दोन वर्षांत झालेले खरेदी-विक्री व्यवहार, परिसराची संभाव्य वाढ, विकसन क्षमता याचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क परिसर हा सर्वांत महागडा ठरला आहे. कोथरूड परिसरात मोकळ्या जागांचा दर हा ४५ हजार रुपये प्रति चौरस मीटर, बाणेरमध्ये ३५ हजार ९०० रुपये प्रति चौरस मीटर तर बालेवाडी परिसरात ३१ हजार ४३० रुपये प्रति चौरस मीटर इतका दर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT