आठवडी बाजारातील भाज्यांचे दर दर्शवणारे जाहीरात फलक शेजारी शेजारी लावण्यात आल्याने स्पर्धेचे वातावरण तयार झाले आहे. sakal
पुणे

कोथरुड : तुझी भाजी माझ्या भाजीहून स्वस्त कशी

आठवडे बाजाराच्या स्पर्धेमुळे चर्चेला उधाण

जितेंद्र मैड

कोथरुड : मंडईत चढ्या दराने भाज्यांची विक्री होत असताना आठवडी बाजारात मात्र स्वस्तात भाजी मिळत आहे. एकाच भागातील दोन आठवडी बाजारातील भाज्यांच्या दरातही तफावत आढळत असल्याने तुझी भाजी माझ्या भाजीहून स्वस्त कशी अशी चर्चा गृहीणींमध्ये रंगली.

रामबाग कॉलनी येथील स्वप्नपूर्ती हॉल समोरील बाजूस नव्याने शनिवारपासून शेतकरी आठवडे बाजार सुरु झाला आहे. दुसरा आठवडे बाजार येथून जवळच असलेल्या रामबाग कॉलनीतील गजानन महाराज मंदिरा जवळ रविवारी भरतो. या दोन्ही भाजारातील भाज्यांचे दर दर्शवणारे फलक दूरदर्शन केंद्र रस्त्यावर लावण्यात आले आहेत.

एका ठिकाणी कोथंबीर 15 ला जुडी तर दुस-या ठिकाणी 10 रुपये जुडी हा भाव दर्शवला आहे. त्याचप्रमाणे कांद्याचे दर 20 – 25, बटाटा 15 -20 असे आहेत.

मंडईत कांदा, कोथंबीरीने पन्नाशी गाठलेली असतानाच्या काळात स्वस्तात मिळणा-या या भाजीला आगामी निवडणुका व राजकीय स्पर्धेचा वास येत आहे. बाकी काही असले तरी ग्राहकांना स्वस्त भाजी मिळतेय ही बाब चांगली आहे. चांगल्या कामासाठी सकारात्मक स्पर्धा झाली तर ती आम्हाला हवीच आहे. त्याला इतर वळण नको अशी अपेक्षाही बाजारात आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT