police sakal
पुणे

कोथरूडच्या हरविलेल्या ८० वर्षाच्या आजी घरी पोचल्या

वारजे माळवाडी पोलिसांनी सोशल मीडियातून व्हायरल केल्याने नातेवाईक पोचले पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा

वारजे माळवाडी : कोथरुड (kothrud) सुतारदरा परिसरातील ८० वर्षाच्या त्या आजी घराबाहेर पडल्या. घरी जायचा रस्ता विसरल्याने त्या वारजे माळवाडीतील (warje malwadi)पोचल्या. त्यांना नाव फक्त सांगता येत होते. पोलिसांनी त्यांचा फोटो व नाव सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने त्यांचे नातवाईक आले आणि त्या पुन्हा घरी पोचल्या. (Kothrud lost 80-year-old grandmother reached home)

सहायक पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाठक यांनी सांगितले की, शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिस हवालदार यांना बाळू गायकवाड यांना मिळालेल्या माहिती दिल्यानुसार, वारजे माळवाडी बसस्टॉप जवळ एक वयस्कर महिला सकाळपासुन बसलेली आहे. गायकवाड तेथे गेले. अंदाजे ८० वर्ष वयाच्या महिला थंडीने कुडकुडत बसलेली दिसली. तिला चहा पाणी दिले. त्यांना नाव पत्ता विचारल्यावर त्यांनी नाव सोनाबाई काजळे असे सांगितले. त्या कोठ राहतात ते सांगता आले नाही. तिचे नातवाईक मिळावे. म्हणून त्याचा फोटो काढला. सोशल मिडीयाच्या स्थानिक ग्रुपवर पाठविले. तसेच पोलिस ठाण्याच्या परिसरात चौकशी केली.

त्यावर, तिचा नातु ज्ञानेश्वर सुभाष काजळे, (वय २२, रा. शिवकल्याण मित्र मंडळासमोर सुतारदरा कोथरुड) हे स्वतः आले. आजींना पाहुन व ओळखुन त्या महिला ही माझी आजी सोनाबाई शिवराम काजळे आहेत असे सांगितले. शनिवारी सकाळी दहा वाजता नेहमीप्रमाणे वस्तीमध्ये फिरण्याकरता गेली होती. ती परत आली नाही. असे सांगितले. त्यानुसार आम्ही सुतारदरा परिसरात शोध घेत होतो. सोशल मिडिया वरील तिचे फोटो पाहून तिला घरी घेवुन जाण्यासाठी आल्याचे सांगितले. तसा त्यांचा जबाब घेतला. आजी व नातु यांचे ओळखपत्राचे तपासून खात्री करुन हरवलेल्या आजी सोनाबाई काजळे यांना त्यांचा नातु ज्ञानेश्वर काजळे यांचे ताब्यात सुखरुप दिले. आजी मिळाल्याने ज्ञानेश्वर काजळे यांनी वारजे माळवाडी पोलीसांचे आभार मानले.

दहा दिवसातील दुसरी घटना

वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहा दिवसातील अशा प्रकाराची हि दुसरी घटना आहे. ३० जून रोजी कोथरूड येथून ९० वर्षाच्या शैलेजा श्रीपाद धायगुडे या ३० जुलै रोजी वारजे परिसरात रस्ता चुकून आल्या होत्या. त्या नुकत्याच कराडहुन कोथरूडला भावाकडे आल्या होत्या. कामानिमित्त भावाच्या घरातून त्याबाहेर पडल्या. वयोमानानुसार पण त्यांना घरी जाण्याचा रस्ता आठवेना. आणि त्या रिक्षात बसल्या. घर शोधत होत्या. परंतु त्यांना काय घर सापडले नाही. रिक्षा वाल्याणे त्यांना घेऊन वारजे आकाशनगर सोडले. त्यावेळी देखील अशा प्रकारे सोशल मीडियातून संदेश पाठविल्यावर नातेवाईक घेण्यास आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Employees: महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी! कर्मचाऱ्यांचा श्वास घोटणारा प्रस्ताव, कामाचे तास वाढणार?

Army Love Story : हमारी अधुरी कहाणी! शहीद मेजर नायर यांची हार्टब्रेकिंग लवस्टोरी; ज्या मुलीवर प्रेम केलं तिला पॅरालिसिस झाला अन्...

Latest Maharashtra News Updates : विखे, सामंत, जरांगेंना भेटणार, चर्चांना उधाण

Ganesh Chaturthi 2025: यूट्यूब अन् ऑडिओ लावून पूजा करणे योग्य आहे का? वाचा एका क्लिकवर

Video : तरुणाने तरुणीशेजारी बसून पॅन्ट काढली अन्...; लोकल ट्रेनमध्ये केले घाणेरडे चाळे, मुंबईतला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT