रिक्षावाला  sakal
पुणे

कोथरुड : रिक्षावाला व पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मिळाली हरवलेली आई

रिक्षा चालकांनी त्यांना कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी आणले

जितेंद्र मैड

कोथरुड : चांदणी चौक येथे विमनस्क अवस्थेत असलेल्या वृध्द आजींना पाहून बापू भागवत जाधव (केळेवाडी) व संतोष संदीपन साबळे (शास्त्री नगर कोथरुड) या रीक्षा चालकांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. त्यांना त्यांचे नाव, गाव वा कोठे जायचे हे सांगता आले नाही. त्यामुळे त्या रिक्षा चालकांनी त्यांना कोथरुड पोलिस ठाण्यात मंगळवारी आणले. स्वतःबद्दल काहीही सांगू न शकणा-या या आजींना त्यांचा कुटूंबीयांपर्यंत कसे पोहचवायचे हे पोलिसांपुढे आव्हानच होते.

पोलिस उपनिरिक्षक कुलकर्णी, अंमलदार दीपक धाबेकर व रमेश चौधरी यांनी त्यांच्याबाबत कोठे हरलवल्याची तक्रार आहे का याची चौकशी केली परंतु तसे आढळून आले. नाही. महिला आंमलदार वैशाली परदेशी व स्नेहल गायकवाड यांनी आजींकडे जीव्हाळ्याने विचारपुस केली. परंतु वयोमान व विस्मरणामुळे त्यांना फारसे काही सांगता आले नाही. मात्र सकाळी त्यांनी त्यांचे गाव मोहज देव्हडे असल्याचे सांगितले. त्याचा संदर्भ घेत अंमलदार दादा भवर यांनी याच गावात असलेल्या त्यांच्या मित्राकडे चौकशी केली असता कळाले की मुंबई येथील जुईनगर मध्ये मुलीकडे आजी रहात होत्या. तेथून या आजी दोन दिवसापूर्वी हरवल्या होत्या. त्याबाबत वाशी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.

या आजींचा मुलगा सत्यवान ज्ञानदेव उबाळे हे देहूरोड येथे राहतात. ते आईला शोधण्यासाठी नवी मुंबईला गेले होते. आई सापडत नसल्याने ते सुध्दा बेचैन होते. तेव्ढ्यात आई मिळाल्याची माहिती मिळाल्याने त्यांना हायसे वाटले. त्यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात येवून आईची गळाभेट घेतली. आईचे नाव साखराबाई ज्ञानदेव उबाळे असून त्यांचे वय 84 आहे.

वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र जगताप म्हणाले की, रीक्षा चालकांनी आजींची माणुसकीने विचारपूस केली व त्यांना पोलिस ठाण्यात आणल्याने हे शक्य झाले. कोथरुडमधील नागरिक जागृक व माणुसकीने वागत आहेत त्यामुळे आजींना त्यांच्या घरी पोहचवण्यात यश मिळाले. रीक्षावाल्याने नम्रपणे त्याचे नाव सांगण्यास नकार दिला हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT