kothrud.jpg 
पुणे

कोथरूडमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोडे मारो आंदोलन 

महादेव पवार

वारजे (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कोथरुड विधानसभा मतदार संघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आज महर्षी कर्वे पुतळा चौक, कोथरुड येथे  पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करून जाहिर निषेध करण्यात आला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन व जोडे मारुन पडळकर यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

आंदोलनाच्या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षित अंतर ठेवून शासकीय नियमांचे व फिजीकल डिस्टीन्सिंगचे पालन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी  कोथरुड विधानसभा मतदार संघ अध्यक्ष स्वप्नील दुधाने, कार्याध्यक्ष नितीन कळमकर, माजी अध्यक्ष मिलिंद वालवडकर, वरिष्ठ उपाध्यक्ष अर्जुन ननावरे, बाबा खान, महिला अध्यक्ष आरती गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, युवती अध्यक्ष योगिता बावकर, कामगार सेल अध्यक्ष राजेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष शुभम माताळे,  कोथरुडचे उपाध्यक्ष कैलास मकवान आदी पदाधिकरी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी पडळकर यांचा जाहिर निषेध करणारा फ्लेक्स तयार केला होता. त्यावर पडळकर यांचा फोटोही लावण्यात आला होता. त्याच फोटोला राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी निषेध म्हणून जोडे मारले. 

शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी सर्व आयुष्य वेचले आहे. आणि त्यांच्यावर असे आरोप होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. पडळकरांना आम्ही त्यांची जागा दाखवूनच देऊ. 
स्वप्निल दुधाने, अध्यक्ष -राष्ट्रवादी कोथरूड विधानसभा मतदार संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : राजकोटच्या काही भागांत मुसळधार पाऊस

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT