Amol Nakate Sakal
पुणे

Open Gym : ओपन जीममध्ये वीजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यु

युवकाचा ओपन जीमवर व्यायाम करताना झाला मृत्यु.

सकाळ वृत्तसेवा

युवकाचा ओपन जीमवर व्यायाम करताना झाला मृत्यु.

कोथरूड - अमोल शंकर नाकते (वय-22) रा. भूगाव या युवकाचा उजव्या भुसारी कॉलनीतील ओपन जीमवर व्यायाम करताना मृत्यु झाला. संध्याकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. त्याच्यामागे आई व भाऊ असा परिवार आहे.

अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंट ची कामे करायचा. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानात मित्रांसोबत यायचा. आजही तो व्यायाम करता करता फोनवर बोलत होता. अचानक तो खाली पडल्याचे पाहून मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला जवळच्या इस्पितळात दाखल केले. त्याच्या पायातून विजेचा प्रवाह वाहिल्याने पायाची बोटे काळेनीळे झाले होते. डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले.

हेल्प रायडर प्रशांत कनोजिया म्हणाले की, ओपन जीमच्या या खेळण्याखालून वीजेच्या वाहिन्या जात आहेत. त्याची योग्य तपासणी करावी.

अग्निशमन दलाचे गजानन पाथ्रुडकर म्हणाले की, खुल्या मैदानात जॉगिंग ट्रॅक व ओपन जीम आहे. येथे वीजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यु झाला. हा वीज प्रवाह कोणता याची अधिक तपासणी करणे गरजेचे आहे. कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील म्हणाले की, तपास सुरू आहे. पोस्ट मार्टम रिपोर्ट आल्यावर यावर अधिक सांगता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayor Manjusha Nagpure : पुणे महापालिका ॲक्शन मोडमध्ये! शहर तुंबल्यानंतर महापौरांनी प्रशासनाला घेतले फैलावर, 'या' 227 ठिकाणांसाठी नवा प्लॅन

Mahakal the Master of time: जगाची वेळ बदलणार का? उज्जैनमधून 'महाकाल टाइम'चा नवा दावा, ग्रीनविचला आव्हान!

Pune Railway Station Expansion : पुणेकरांसाठी गूड न्यूज! रेल्वे स्थानकावर येणार 6 नवीन फलाट; 400 कोटींचा मेगा प्लॅन तयार, आता 'या' मार्गाने मिळणार एन्ट्री

गायिका सावनी रवींद्रचा नवा प्रवास सुरु !'सावनी रेकॉर्डझ्' या म्युझिक लेबलची घोषणा; पहिलं गाणंही केलं रिलीज

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT