सकाळ कार्यालय, पिंपरी - ‘कॉफी विथ सकाळ’ या कार्यक्रमात समस्या मांडताना ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’चे पदाधिकारी. 
पुणे

‘केपीओ’, ‘बीपीओ’त तुटपुंजे वेतन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘‘माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी तीस टक्‍के लोक केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि बीपीओमध्ये (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) काम करतात. परंतु, त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन मिळते. कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते,’’ अशी कैफियत फोरम फॉर आयटी एम्प्लॉईजच्या (फाइट) पदाधिकाऱ्यांनी मांडली. 

सकाळतर्फे आयोजित केलेल्या कॉफी विथ सकाळमध्ये ते बोलत होते. संघटनेचे राज्याचे अध्यक्ष पवनजित माने, संयुक्‍त सचिव हरप्रीत सलुजा, उपाध्यक्ष विवेक मेस्त्री, ललित गायकवाड, सचिन चव्हाण यांनी सहभाग घेतला. बीपीओ आणि केपीओमधील कर्मचाऱ्यांना १५ ते १६ हजार रुपयांपर्यंत वेतन आहे. रात्री उशिरापर्यंत काम करूनही रात्रीपाळीचा भत्ता देण्यात येत नाही. यासंदर्भात राज्याच्या किमान वेतन कायदा समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली असून हा विषय सरकारपर्यंत पोचविणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले आहे.

पुण्याचा समावेश मेट्रोसिटीत झाला आहे. आयटी कंपन्यांचा विस्तारदेखील झपाट्याने होत आहे. त्यामुळे याठिकाणी बीपीओ, केपीओमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त वेतन मिळणे अपेक्षित आहे. देशाच्या राजधानीत बीपीओ, केपीओमधील कर्मचाऱ्यांना १८ ते २० हजारांपर्यंत वेतन मिळत आहे, असे माने यांनी सांगितले.

कामगार कल्याण निधीची कपात नाही
आयटी कंपन्यांनी कामगारांना वेतन देताना त्यांच्या वेतनातून कामगार कल्याण निधी कापणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक कंपन्या ते करत नाहीत. आयटी कर्मचाऱ्यांनादेखील त्याविषयी फारशी माहिती नाही. याबाबत जागृती आणण्यासाठी संघटनेने पुढाकार घेतला आहे.

समितीची स्थापना नाही
आयटी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सुटाव्यात म्हणून समितीची स्थापना करण्याची मागणी फाइटने राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले, त्या वेळेस समिती स्थापन करण्याचे आश्‍वासन आजतागायत पूर्ण झाले नाही. त्यामुळे आम्ही कुणाकडे दाद मागायची, असा सवाल माने यांनी उपस्थित केला. 

जनजागृती सुरू
आयटीत काम करणाऱ्यांना कामगार कायद्याची माहिती नाही, त्यामुळे एखादी परिस्थिती निर्माण झाली की या मंडळींकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. भविष्यात आयटी कंपन्यांमध्ये असे प्रकार झाले तर कर्मचाऱ्यांमध्ये जागृती असावी, म्हणून फोरम फॉर आयटी एम्प्लाइजने कामगार कायद्याबद्दल जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT