Krishi-Culture 
पुणे

कृषिकल्चर ज्ञानसोहळा एक ऑक्‍टोबरला पुण्यात

सकाळवृत्तसेवा

पुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूहशेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे अत्यावश्‍यक आहे. यावर प्रकाश टाकणारा तसेच स्मार्ट व शाश्‍वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा ‘कृषिकल्चर’ हा एकदिवसीय ज्ञानसोहळा ‘एपी ग्लोबाले’ समूहातर्फे येत्या एक ऑक्‍टोबरला पुण्यात आयोजिला आहे. 

या कार्यक्रमाचे उद्‌घाटन राज्याचे कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्‍वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करतील.

कृषी क्षेत्रातील नवउद्योजक, महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची व संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधन पाहण्याची संधीही मिळणार आहे. एमएसीसीआयए, चतूर आयडीयास, एक्‍सक्‍युबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउडेशन, बोलेरो मॅक्‍सीट्रक प्लस, बोलेरो पिकअप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे याचे प्रायोजक आहेत. कार्यक्रमास प्रवेश मोफत प्रवेश आहे. त्यात प्रशिक्षण साहित्य, जेवणाचा समावेश आहे.

या विषयांवर जागर 
    स्मार्ट व्हिलेजसाठीचे कौशल्य
    ग्रामीण भारताच्या बदलासाठी नवे पाऊल  
    शाश्‍वत शेतीसाठीचे उपाय 
    समूहशेती पद्धतीने ग्रामीण विकास 
    पारंपरिकतेकडून आधुनिक शेतीकडे
    ग्रामीण विकासात मार्केटिंगचे महत्त्व
    शेतीतील समान समस्यांवर सामूहिक उपाय

येथे करा नोंदणी
नावनोंदणीसाठी ८६६९६८९०१७ आणि ९७७३७७७३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. याशिवाय info@krishiculture.in. आणि www.krishiculture.in या वेबसाइटवर कार्यक्रमाची माहिती उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup मधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंड मायदेशी मग आम्हीच भारतात का अडकलो? द. आफ्रिका-वेस्ट इंडिज खेळाडू ICC वर तापले

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Latest Marathi News Live Update : रंगपंचमी निमित्ताने पोलिसांकडून कोल्हापूर-गगनबावडा रोडवर वाहनांची तपासणी

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

SCROLL FOR NEXT