पुणे

इंद्रायणी औद्योगिक वसाहतीला ‘कृष्णरावजी भेगडे’ यांचे नाव

CD

वडगाव मावळ, ता. ४ : मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रूक येथील इंद्रायणी सहकारी औद्योगिक वसाहतीचे नामकरण नुकतेच करण्यात आले. वसाहतीचे पूर्वीचे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत हे नाव बदलून आता ‘कृष्णरावजी भेगडे इंद्रायणी औद्योगिक सहकारी वसाहत मर्या.’ असे करण्यात आले. तालुक्यातील भूमिपुत्रांना सहकाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी मावळ तालुक्याचे माजी आमदार कृष्णरावजी भेगडे यांच्या दूरदृष्टीने या सहकारी औद्योगिक क्षेत्राची उभारणी करण्यात आली होती. त्यांच्या या कार्याला समर्पित असे नामकरण करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष सचिन तथा बाळासाहेब ढोरे, संचालक गणेश खांडगे, राजश्री म्हस्के, राजेश गाडे-पाटील, अरुण वाघमारे, व्यवस्थापक बाळासाहेब गाडे-पाटील, विनायक कदम, हर्षवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.
शेलार यांनी सांगितले की, ‘‘मावळ तालुक्यातील उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी अनुकूल वातावरण मिळावे व येथील ग्रामीण भागात सहकाराची समृद्धी रुजविण्यासाठी कृष्णराव भेगडे यांनी टाकवे येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले. टाकवे परिसर आता उद्योग व्यवसायाचे नवे केंद्र बनत असून, या सहकारी औद्योगिक वसाहतीस कृष्णराव भेगडे यांचे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला व त्यानुसार हे नामकरण झाले आहे. या नामांतराला सहकार विभागाने कायदेशीर मंजुरी दिली आहे.

रोजगारनिर्मितीला मोठी चालना
ही औद्योगिक वसाहत उद्योजकांसाठी विकासाचा आधारस्तंभ ठरत आहे. लघू, मध्यम उद्योगांना एकत्र आणत उद्योजकांना जागा, पाणीपुरवठा, वीज तसेच आवश्यक असलेल्या पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ही संस्था करत आहे. सध्या वसाहतीतील अनेक कारखाने कार्यरत असून, येत्या काळात अनेक नवीन उद्योग येथे सुरू होणार आहेत. यामुळे मावळ परिसरात रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.

लवकरच कमानीचे भूमिपूजन
नामकरणानंतर औद्योगिक वसाहत संस्थेच्या परिसरात मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात येणाऱ्या भव्य कमानीचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या परिसरात स्व. कृष्णराव भेगडे यांचे स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी दिली. सध्या संस्थेत उपाध्यक्ष सचिन ढोरे, सदस्य गणेश खांडगे, राजश्री म्हस्के, मंगला सरवदे, अरुण वाघमारे, मनोज ढमाले, प्रशांत भागवत, सुरेश आडकर व गणेश पवार आदी सहकारी कार्यरत आहेत. प्रा. सत्यजीत खांडगे यांनी आभार मानले. दरम्यान, इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेमध्ये नामफलकाचे प्रातिनिधीक अनावरण उद्योगपती अरुण फिरोदिया, मालपाणी उद्योगसमूहाचे संजय मालपाणी तसेच संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT