पुणे

मलकापूर कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय प्रश्नमंजुषा

CD

राष्ट्रीय प्रश्नमंजूषात ४६५ विद्यार्थ्यांचा सहभाग

कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये स्पर्धा उत्साहात

मलकापूर, ता. १ : कृष्णा विश्व विद्यापीठ संलग्न कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील ९ वी ‘माईंड एक्सपिडिशन २०२५’ प्रश्नमंजूषा स्पर्धा उत्साहात झाली. सहकारमहर्षी (कै.) जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम फेरीत झालेल्या चुरशीच्या लढतीत श्रेया परीट हिने प्रथम, तर मनीषा बाड हिने द्वितीय क्रमांक मिळविला.

कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कृष्टतेसोबतच व्यावसायिक प्रगती साधण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. यावेळी कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे उपस्थित होते.
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉ. एन. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेस महाराष्ट्र, गुजरात, बिहार, केरळ, गोवा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून ४६५ हून अधिक विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला. डॉ. सचिन पाटील, डॉ. गणेश वाडकर, डॉ. सोमनाथ भिंगे यांनी स्पर्धेचे मूल्यमापन केले. समन्वयक डॉ. जे. एस. सावळे यांनी आभार मानले.


A01160
मलकापूर : स्पर्धेतील विजेत्यांसमवेत कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, डॉ. एम. व्ही. घोरपडे, डॉ. एन. आर. जाधव आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT