कृष्णा नाका परिसरामध्ये
झाडांच्या फांद्यांची छाटणी
कऱ्हाड ः कृष्णा नाका परिसरात वीज कपंनीने पावसाळ्याच्या पार्श्र्वभूमीवर आज झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली. सकाळी दहापासून कृष्णा पुलापासून ते नाक्यापर्यंत झाडांच्या फांद्या छाटणीचे काम सुरू होते. वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, याची दक्षता घेऊन फांद्या छाटणीचे काम केले जात होते. पावसाळ्यात वीज तारांमध्ये झाडाच्या फांद्या अडकून दुर्घटना होणार नाही, याची खबरदारी वीज कंपनीने घेतल्याचे दिसून येते.
....................
कऱ्हाडला शाहू चौकात
सिग्नल यंत्रणेची गरज
कऱ्हाड ः येथील शाहू चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे. तहसील कार्यालयाकडून दैत्यनिवारणीकडे जाणारी वाहने व शहर पोलिस ठाण्याकडून दत्त चौकात येणाऱ्या वाहनांमुळे या चौकात कोंडी होते. पोलिसांनी तात्पुरता उपाय म्हणून तेथे बॅरिकेटस लावले असते, तरी त्यामुळे फारसा फरक पडत नसल्याचे दिसून येते. त्यासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिस नियुक्त करण्याची अथवा सिग्नल यंत्रणा बसवण्याची गरज आहे. हा उपाय केला, तरच वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
...................
कृष्णा पुलावर पाणी
साचून राहण्याची भीती
कऱ्हाड ः शहर व परिसरात कालपासून तुरळक पावसाने सुरुवात केली आहे. येथील नवीन, तसेच जुन्या कृष्णा पुलावर स्वच्छता न केल्याने पावसाचे पाणी निचरा होण्यास अडथळा होणार आहे. पाणी निचऱ्यासाठी असलेल्या ठिकाणी माती, कचरा अडकून बसला आहे. त्यामुळे दमदार पावसानंतर पुलावर पाणी साचून राहण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर संबंधित विभागाने तातडीने गांभीर्याने दखल घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.