पुणे

केएसबीची तिमाहीत विक्रीत उत्तम वाढ

CD

‘केएसबी’ची तिमाहीत
विक्रीत उत्तम वाढ

पुणे, ता. ७ः पंप, व्हॉल्व्ह आणि सिस्टीम्स क्षेत्रातील जागतिक कंपनी केएसबी लि.ने वर्ष २०२६च्या दुसऱ्या तिमाहीत सातत्यपूर्ण व्यवसायात वाढ नोंदवली आहे. कंपनीची विक्री ६९०.७० कोटी रुपयांची विक्री नोंदवली असून विविध औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांत महत्त्वाच्या ऑर्डर मिळाल्याने आगामी काळातील व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.

या तिमाहीत कंपनीला गदरवारा ऊर्जा प्रकल्पासाठी पहिली एलयूव्ही पंप ऑर्डर, कैगा अणुऊर्जा प्रकल्पासाठी शटडाउन कूलिंग पंप महावितरणकडून २००० सौर पंपांचा लेटर ऑफ इंटेंट; तसेच पवनऊर्जा क्षेत्रातील पहिली कूलिंग पंप ऑर्डर प्राप्त झाली आहे. विविध क्षेत्रांतील ऑर्डरमुळे ग्राहकांचा कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे कंपनीच्या विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष प्रशांत कुमार यांनी सांगितले. महसुलात सकारात्मक वाढ कायम असून कार्यक्षमतेवर आणि खर्च नियंत्रणावर कंपनीचे लक्ष केंद्रित असल्याचे मुख्य वित्त अधिकारी महेश भावे यांनी नमूद केले. औद्योगिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या गुंतवणुकीमुळे आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळण्याच्या आणि व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध राहतील, असेही कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT