पुणे

राष्ट्रबांधणीच्या कार्यात योगदान द्या

CD

PNE26W59630 सोलापूर ः अभाविपने आयोजिलेल्या क्षितिज युवती संमेलनाच्या उद्‍घाटनप्रसंगी राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा, उद्योगवर्धिनीच्या चंद्रिका चौहान, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, डॉ. स्मितांजली दामा, नताशा कोतापल्ली, ॲड. रेवती मुदलीयार आदी.

PNE26W59629 सोलापूर ः अभाविपकडून झालेल्या क्षितिज युवती संमेलनास उपस्थित युवती.

राष्ट्रबांधणीच्या कार्यात विद्यार्थिनींनी योगदान द्यावे

क्षमा शर्मा यांचे आवाहन; अभाविपच्या क्षितिज युवती संमेलनाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर, ता. १७ : देशाला सशक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) माध्यमातून विद्यार्थिनींनी राष्ट्रबांधणीच्या कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री क्षमा शर्मा यांनी केले.
अभाविपतर्फे शनिवारी (ता. १७) हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित ‘क्षितिज युवती संमेलना’च्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दीपप्रज्वलन तसेच श्री सरस्वती देवी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमापूजनाने संमेलनाचे उद्‍घाटन झाले. उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्ष चंद्रिका चौहान, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, संमेलन व्यवस्था प्रमुख डॉ. स्मितांजली दामा, महानगर सहमंत्री तथा संमेलन प्रमुख नताशा कोतापल्ली आणि संमेलन समितीच्या सचिव ॲड. रेवती मुदलीयार आदी उपस्थित होते. क्षमा शर्मा म्हणाल्या, भारतीय स्त्रियांनी आजच नव्हे, तर इतिहासातही आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. जिजामाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा आणि राणी दुर्गावती यांच्यापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थिनींनी जगातील सर्वांत मोठे विद्यार्थी संघटन असलेल्या अभाविपच्या माध्यमातून समाजसेवेत योगदान द्यावे.
उद्योगवर्धिनीच्या अध्यक्ष चंद्रिका चौहान म्हणाल्या, स्त्रियांनी न्यूनगंड झटकून खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. २०४७ मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी स्त्रीशक्तीचे योगदान महत्त्वाचे असेल. कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, पृथ्वीराज सावंत, अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ. शांतीनाथ बागेवाडी, महानगर अध्यक्ष प्रा. शिवकुमार बिरादार, उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास भंडारी, प्रा. जगदेव बिराजदार, जिल्हाप्रमुख प्रा. धन्यकुमार बिराजदार, जिल्हा संयोजक उमेश वंजारी आणि महानगर मंत्री रविकांत चांभार उपस्थित होते. महानगर सहमंत्री नताशा कोतापल्ली यांनी प्रास्ताविक केले. प्रा. श्रुती देवळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्मितांजली दामा यांनी आभार मानले.


चौकट
सेवा प्रकल्पांत सहभागाची ग्वाही
केवळ सामाजिक प्रश्नांवर टीका करण्यापेक्षा ते सोडविण्यासाठी विद्यार्थिनींनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे चौहान यांनी सांगितले. त्याला उपस्थित विद्यार्थिनींनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रतिसाद देत विविध सामाजिक उपक्रम व सेवा प्रकल्पांत सहभागी होण्याची ग्वाही दिली.

शोभायात्रेने संमेलनाचा समारोप
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात राजेंद्र हक्के यांच्या ‘मिशन साहसी’ कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तिसऱ्या सत्रात विविध सामाजिक विषयांवरील नृत्यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम झाला. शोभायात्रा आणि संपूर्ण वंदे मातरम्‌ने संमेलनाचा समारोप झाला. हुतात्मा स्मृती मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा सरस्वती चौक, सुभाष चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा चौकात विसर्जित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT