नारायणगाव, ता. ५ : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात बुधवारी दुपारी चारपर्यंत ८५.८१ टक्के (२५.४६ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आज अखेर प्रकल्पात ६८.८८ टक्के (२०.४४ टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा होता. तुलनेने यावर्षी १६.९३ टक्के जास्त उपयुक्त पाणीसाठा आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात मागील दोन महिन्यात सरासरी ६७८.२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला आहे. सर्वात जास्त १०९२ मिलिमीटर पाऊस डिंभे धरण पाणलोट क्षेत्रात झाला आहे. यामुळे १२.५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असलेले डिंभे धरण यावर्षी जुलै अखेर शंभर टक्के भरले आहे. जूनपासून आजअखेर कुकडी प्रकल्पात एकूण ४३.२८ टीएमसी पाणी जमा झाले. पूर नियंत्रण व धरण सुरक्षितता या कारणास्तव विसर्ग सोडून प्रकल्पात आज अखेर २५.४६ टीएमसी (८५.८१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.
धरण निहाय उपयुक्त पाणीसाठा : टीएमसी, टक्के व झालेला एकूण पाऊस :
• येडगाव : १. ९२ टीएमसी, ९९.१४ टक्के, ५०५ मिलिमीटर.
• माणिकडोह : ७. २५१ टीएमसी, ७१.२३ टक्के, ९४० मिलिमीटर.
• वडज : ०.९८८ टीएमसी, ८४.२७ टक्के, ६२८ मिलिमीटर.
• पिंपळगाव जोगे : ३.३४६ टीएमसी, ८६.०२ टक्के, ८०० मिलिमीटर.
• डिंभे : ११.९५ टीएमसी, ९५.६७ टक्के, १०९२ मिलिमीटर.
• चिल्हेवाडी : ०.६५५ टीएमसी, ८१.६९ टक्के, ५२५ मिलिमीटर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.