Baramati Loksabha  sakal
पुणे

Baramati Loksabha : कुलदीप कोंडे यांच्या शिवसेना प्रवेशावर मुळशीतील पदाधिकारी नाराज

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कुलदीप कोंडे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला असून मुळशीतील शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पिरंगुट : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कुलदीप कोंडे यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला असून मुळशीतील शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे ) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मुळशीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुळशी तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख सचिन खैरे म्हणाले ,

" कुलदीप कोंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी मुळशीतील सर्व शिवसैनिक जाग्यावरच आहेत. कोणताही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर गेलेला नाही. आमदारकी लढविलेला माणूस जरी तिकडे गेला असला तरी त्यांना निवडून देणारी माणसे आमच्याकडेच आहेत. कोंडे यांना आमदारकीच्यावेळी मिळालेले एक लाख मतदान हे आमच्या शिवसैनिकांनी दिलेले आहे. कोंडे जोपर्यंत शिवसेनेत होते तोपर्यंत त्यांना मानणारा वर्ग होता.

पण त्यांनीही गद्दारी केल्याने त्यांना आता मतदान होणार नाही. मुळात कोंडे हे शिवसेनेत आयाराम नेते आहेत. २०१२ साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना जिल्हा प्रमुख , सहसंपर्कप्रमुख , जिल्हा संघटक आदी पदे दिली तरी त्यांनी गद्दारी केल्याने शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून देणार. यांना मिळालेले मतदान हे शिवसैनिकांनी दिलेले आहे."

जिल्हा महिला संघटिका स्वाती ढमाले म्हणाल्या , " कोंडे हे कोणत्यातरी लाभापायी तिकडे गेले असतील.शिवसेनेने त्यांना दोनवेळा विधानसभा , दोनवेळा जिल्हा परिषदेची तिकिटे दिली. त्यांना आमदारकीच्यावेळी मिळालेली मते ही कुठल्या एका जातीची अथवा पक्षाची नव्हती. ही सगळी मते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या शिवसेनेची मते होती. त्यामुळे ही एक लाख मते कोंडे मिळवून देऊ शकणार नाहीत. आम्ही सर्व शिवसैनिक सुप्रिया सुळे यांनाच मतदान करणार आहोत."

जिल्हा उपप्रमुख संतोष मोहोळ म्हणाले , " दोनवेळा विधानसभा , दोनवेळा जिल्हा परिषद तर तीनवेळा पंचायत समितीसाठी कोंडे यांच्या उमेदवाराला संधी दिली तरीही कोंडे यांनी पक्ष सोडला. तरीही शिवसैनिक मात्र कुठेही गेलेले नाहीत. आम्ही सर्व शिवसैनिक असून सध्याच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत हे बघतच नसून उ्दधव ठाकरेच उमेदवार आहेत असे समजून ताकद लावणार आहोत. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् टीम इंडियाचा धावांचा एव्हरेस्ट! संजू सॅमसनची सलग फिफ्टी...

SCROLL FOR NEXT