Kumar Ketkar criticized BJP policies 
पुणे

'द्वेषभावना असेल, तरच तुम्ही राष्ट्रभक्त'

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘‘सध्याच्या वातावरणात द्वेषभावना असेल, तरच तुम्ही राष्ट्रभक्त आहात,’’ अशा शब्दांत खासदार कुमार केतकर यांनी रविवारी सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. 

धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात केतकर बोलत होते. या वेळी केतकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते उमरअली सय्यद, हार्मोनिअम वादक डॉ. अरविंद थत्ते आणि साईनाथ मंडळाचे पीयूष शहा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी तालयोगी पं. सुरेश तळवलकर, खासदार गिरीश बापट, उल्हास पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी, शुभांगी थोरात, रामदास फुटाणे आदी उपस्थित होते.

केतकर म्हणाले,‘‘ सध्याच्या वातावरणात हिंदू गणेशोत्सव कार्यकर्ता आणि मुस्लिम शिक्षकाला पुरस्कार दिला जातो आहे. सध्याच्या वातावरणाविरोधात तुम्ही वागले आहात, असे पुरस्कार देऊन तुम्ही राष्ट्रदोहाचे काम केले आहे; पण या राष्ट्रदोहाचे आपण स्वागत करावयाला हवे. असे पुरस्कार देण्याचे काम जर राष्ट्रदोहाचे असेल, तर त्या राष्ट्रद्रोहाने राष्ट्र एकत्र येईल. मात्र खोट्या राष्ट्रप्रेमाने  राष्ट्र दुभंगेल.’’

या वेळी अरविंद थत्ते, पीयूष शहा आदींची भाषणे झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विकास अबनावे यांनी आभार मानले.

शिक्षक हा समाजाचा कार्यकर्ता असेल, तर समाजाची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवायचे असेल, तर शिक्षकालाही चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागेल.
- उमरअली सय्यद, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

PM झालो तर काय करेन? संजय दत्तचं मुन्नाभाई स्टाईलने उत्तर, ट्रम्प यांना म्हणाला...'मामू, तुम भटक गए हो' पंतप्रधान मोदींवरही टोलेबाजी

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

SCROLL FOR NEXT