फोटो
कुंभमेळ्याचे ३५ हजार कोटी
दुष्काळग्रस्तांना द्या : आंबेडकर
सोलापूर, ता. ९ : महाराष्ट्रात सध्या विदर्भ, मराठवाड्यासह अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी संकटात सापडला आहे. अशा बिकट परिस्थितीत आगामी नाशिक कुंभमेळ्यासाठी तरतूद करण्यात आलेला ३५ हजार कोटी रुपयांचा निधी तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
आंबेडकर यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, मराठवाडा आणि विदर्भात हवा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा वेळी सरकारचे प्राधान्यक्रम चुकले आहेत. कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींचे बजेट मंजूर केले जात आहे; मात्र बळीराजा संकटात असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. धार्मिक उत्सवांवर हजारो कोटींचा खर्च करण्याऐवजी सरकारने संवेदनशील राहून हा सर्व निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खर्च करावा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील उधळपट्टीवर बोलताना आंबेडकर म्हणाले, ‘झेन झी’ भाजपविरोधात गेली आहे. त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम घेतात. बरेच ‘झेन झी’ शेतकऱ्यांची मुलं आहेत, हे विसरले आहेत. त्यांनी आता कितीही खटाटोप केला तरी ‘झेन झी’ त्यांच्यासोबत जाणार नाही. त्यामुळे हे सगळं थांबवा आणि शेतकऱ्यांकडे निधी वळवा, असेही आंबेडकर म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.