पुणे

पिंपळनेर येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार तीन गंभीर

CD

अज्ञात वाहनाच्या धडकेत
एक ठार, तिघे गंभीर जखमी
कुर्डुवाडी - टेंभुर्णी रस्त्यावर अपघात
सकाळ वृत्तसेवा
पिंपळनेर, ता. १ : कुर्डुवाडी- टेंभुर्णी रस्त्यावर पिंपळनेर येथील सीना- माढा जलसिंचन योजनेच्या कालव्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका ऊसतोड मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. शनिवारी (ता. ३१) रात्री सुमारे दहाच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना तातडीने कुर्डुवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिंपळनेरहून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात परमेश्वर देवकर (वय २२, रा. अमनवाडी, जि. वाशीम) यांचा जागीच मृत्यू झाला. बळिराम धोत्रे (वय ४०), राजू धोत्रे (वय २८) आणि मुरली (वय ३०, तिघेही रा. अमनवाडी, जि. वाशीम) हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची तीव्रता एवढी होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये दूरवर फेकले गेले. स्थानिक युवकांनी तत्परता दाखवत जखमींना झुडपांतून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यास मदत केली. तसेच रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.
गेल्या महिनाभरात या रस्त्यावर मोठ्या अपघाताची ही तिसरी घटना आहे. पिंपळनेर परिसरात अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

Disclosure Day Movie Review : साय-फाय चित्रपट पाहताना विचारांना नवी दिशा; ‘डिस्क्लोजर डे’मधील चार कथांचा अनोखा प्रवास

Success Story: रायगडच्या लेकीची आकाशाला गवसणी! सानिका पांगारेची विमान क्षेत्रात भरारी, शिष्यवृत्तीची साथ अन् जिद्दीची प्रेरणादायी कहाणी

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील हवामानात बदल; कोकण ते विदर्भात पावसाची शक्यता, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Indian Watercolor Art : बंगालच्या खेड्यातून जागतिक कलेपर्यंत; समीर मोंडल यांचा वॉटरकलर प्रवास

SCROLL FOR NEXT