पुणे

कुर्डुवाडी-माढा रस्त्यावरील बेंद ओढ्यावरील पुलाजवळील रस्त्यावरील मोठे खड्डे देत आहेत अपघातांना निमंत्रण

CD

KDW26B04816
कुर्डुवाडी (ता. माढा) : भोसरे ते वडाचीवाडीदरम्यान बेंदओढ्याच्या दोन्ही बाजूस असलेला खड्डेमय रस्ता.
.......

भोसरे-वडाचीवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ३ महिन्यांत अनेक अपघात
..........
बेंदओढा परिसरातील दोन्ही बाजूंच्या रस्त्याची चाळण; ७ मार्चला ३० प्रवाशांची बसही रस्त्याबाहेर
..........
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. ९ : कुर्डुवाडी-माढा मार्गावरील भोसरे ते वडाचीवाडी दरम्यान बेंदओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत या परिसरात दुचाकी घसरून पडणे, चारचाकी खड्ड्यात अडकणे व उसाच्या ट्रॉली पलटी होणे अशा अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. ७ मार्च रोजी ३० हून अधिक प्रवासी असलेली बसही रस्त्याबाहेर जाऊन चाक खड्ड्यात अडकल्याची घटना घडली होती मात्र त्यातील प्रवाशांनी जिवितहानी टळली होती.
डिसेंबरमध्ये झालेल्या दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला होता. या अपघाताची नोंद कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात झाली होती. त्यामुळे या धोकादायक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे. माढा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कार्यालयीन कामासाठी कुर्डुवाडी, टेंभुर्णी भागातून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची संख्या खूप असते. तसेच माढा व परिसरातील अनेक लोक शासकीय, खासगी कामानिमित्त कुर्डुवाडी, टेंभुर्णीला याच रस्त्यावरून प्रवास करतात. सोलापूर, वैराग, मोहोळ यासह ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी व खासगी वाहनांची संख्या खूप आहे.
साखर कारखाने चालू असताना ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर याच रस्त्यावरुन धावतात. सालसे (ता. करमाळा) ते यावली (ता. मोहोळ) यादरम्यान कुर्डुवाडी, माढामार्गे हा नवीन रस्ता काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. रस्ता झाल्यानंतरही भोसरे ते वडाचीवाडी दरम्यान बेंद ओढ्यावरील पुलाचे काम रेंगाळले होते. कसेतरी करून पुलाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले. परंतु पुलाच्या दोन्ही बाजूस साधारणपणे अर्धा किमी अंतराच्या रस्त्यावर खड्डे आहेत. यामुळे अनेक छोटे मोठे अपघात झाले आहेत. या ठिकाणी अनेक वेळा ट्रॅक्टरच्या उसाचे भरलेल्या ट्रॉली पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या पुलाजवळून प्रवास करताना खरी कसरत होते. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी साठल्याने चारचाकी वाहन चालकांना अंदाज येत नाही. हा रस्ता चांगला करावा, अशी मागणी वाहन चालकातून होत आहे.

प्रतिक्रिया
KDW26B04815
या रस्त्यावर रहदारी खूप असते. बेंदओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर करावे.
- अविनाश गोरे, भाजप तालुकाध्यक्ष, कुर्डुवाडी मंडल

कोट
- या पुलाजवळील रस्ता दुरुस्तीचे काम लवकरच करणार आहोत.
-आनंद नाझरे, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कुर्डुवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vedanta Share: एका दिवसात Vedanta कंपनीचे शेअर्स तब्बल 62 टक्यांनी घसरले! नेमकं कारण काय?

DJ Noise Incident : लग्नाच्या वरातीतील डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा, १४० कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Latest Marathi News Live Update : विधान परिषद निवडणुकीबाबत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांची बैठक

Congress MLC Candidate Maharashtra : तीन वाजेपर्यंत थांबा काँग्रेसचा उमेदवार समजेल, नाना पटोले स्पष्टच म्हणाले; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरही भाष्य

Bank News: कामाची बातमी! 1 मे ला बँका बंद की सुरू? RBI ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT