माझे व्हीजन
कुर्डुवाडी नगरपरिषद
-KDW26B04792
महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी प्रयत्न
कुटुंबाची आर्थिक प्रगती होण्यासाठी व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी प्रभागातील महिलांना प्रोत्साहित करून त्यासाठी जी आवश्यक असेल ती मदत करणार आहे. महिलांसाठी आर्थिक स्वयंसहाय्यता समूह, बहुउद्देशीय सामाजिक संस्था स्थापन करुन मार्गदर्शन करणार आहे. महिलांसाठी आरोग्यविषयक, सामाजिक असे विविध उपक्रम राबवणार आहे. तसेच प्रभागातील नागरिकांना वीज, पाणी, गटारी, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेच्या संबंधित विभागांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडे नियोजन करणार आहे. प्रभागातील स्वच्छतेला मी प्राधान्य देणार असून, प्रभागातील प्रत्येक घराजवळ नियमितपणे घंटागाड्या येतील यासाठी नियोजन व अंमलबजावणी करुन घेणार आहे.
- पल्लवी कांबळे, नगरसेविका, कुर्डुवाडी
---
-KDW26B04791
वेळेवर पुरेसे पाणी मिळण्यासाठी प्रयत्न
माझ्या प्रभागातील नागरिकांना वेळेवर नियमित पुरेसे पाणी पुरवठा होण्याला मी प्राधान्य देणार आहे. उजनी धरणातून कंधर ते कुर्डुवाडी ही पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जुनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे सतत लिकेज होते. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते. या पाईपलाईनचे काम लवकर सुरु व्हावे यासाठी आग्रही राहणार आहे. प्रभागातील नागरिकांसाठी पथदिवे, चांगले रस्ते उपलब्ध करुन देणार आहे. कच-यामुळे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे नियमितपणे घंटागाड्या प्रभागात येवून कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छता आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करणार आहे.
- अबोली चौधरी, नगरसेविका, कुर्डुवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.