पुणे

फिरंगाई देवीचा आज गोंधळ सोहळा

CD

कुरकुंभ, ता. २८ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील ग्रामदैवत श्री फिरंगाई माता (वरचे मंदिर) येथे रविवार (ता. १) मार्च पारंपरिक गोंधळ आणि महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात रविवारी सकाळी देवीच्या पंचामृत महापूजेने व अभिषेकाने होणार आहे. त्यानंतर दुपारी देवीचा कुलधर्म-कुलाचार म्हणून ‘गोंधळाचा’ मुख्य कार्यक्रम रंगणार आहे. या सोहळ्याला फिरंगाई देवीचे उपासक अशोकराव खरात (वडगाव धायरी, पुणे) यांच्या हस्ते देवीची विधीवत महाआरती होणार आहे. भक्ती आणि शक्तीचा संगम असलेल्या या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने होईल.
या उत्सवासाठी कुरकुंभ ग्रामस्थ, देवीचे गुरव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. परंपरेनुसार होणाऱ्या या गोंधळ सोहळ्यासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असून, मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या भक्तिमय वातावरणात परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी उपस्थित राहून देवीच्या आशीर्वादाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उत्सव समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nari Shakti Vandan Act Explained: राजकारणात महिलांचा आता सत्तेवर हक्क! ३३ टक्के आरक्षणाचा गेमचेंजर कायदा काय? विरोधकही का झाले अस्वस्थ!

Womens Reservation Bill: मुस्लिम महिलांच्या मुद्द्यावरुन अमित शाह संतापले; अखिलेश यादव यांना जोरदार प्रत्युत्तर

Latest Marathi News Live Update : महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील निवासी डॉक्टर उद्यापासून संप पुकारणार

Pat Cummins:तो येतोय... काव्या मारनच्या गालावरील खळी आणखीन फुलणार; SRH च्या ताफ्यात भारी खेळाडू दाखल

Summer Mobile Cooling Tips : उन्हाळ्यात तुमचा फोनही 'भट्टी'सारखा तापतोय? मग 'ही' १ छोटी सेटिंग करा आणि फोन ठेवा बर्फासारखा कूल!

SCROLL FOR NEXT