mephedrone sakal
पुणे

Drugs Crime : कुरकुंभमध्ये निर्माण झालेल्या मेफेड्रॉनचे हैदर शेखच्या माध्यमातून वितरण

कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील अर्थ केम लॅबेरोटरीत तयार झालेले मेफेड्रोन या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखच्या माध्यमातून वितरित होते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील अर्थ केम लॅबेरोटरीत तयार झालेले मेफेड्रोन या गुन्ह्यातील आरोपी हैदर शेखच्या माध्यमातून वितरित होते. विश्रांतवाडीतील मिठाच्या गोदामात ठेवलेले आणि अर्थ केममध्ये तयार होत असलेले मेफेड्रोन शेखने दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी गुरुवारी (ता. २२) न्यायालयात दिली.

मेफेड्रोनच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत आवश्यक असलेल्या बाबींसाठी आरोपींना कोणी पैसे पुरवले. तसेच मेफेड्रोनच्या विक्रीतून आलेल्या पैशाचे आरोपींनी काय केले याचा तपास पोलिस करीत आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (वय ४०, रा. सोमवार पेठ, खडीचे मैदान), अजय अमरनाथ करोसिया (वय ३४, रा. भवानी पेठ) हैदर नूर शेख (वय ४०, रा. विश्रांतवाडी), भीमाजी परशुराम साबळे (वय ४६, रा. पिंपळे सौदागर, मूळ श्रीगोंदा), युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४१, रा. मरिबाचा वाडा, डोंबिवली) आणि आयुब अकबरशाहा मकानदार (वय ४८, रा. कुपवाड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मकानदार याला गुरुवारी (ता. २२) अटक करण्यात आली आहे. विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि कुपवड येथे केलेल्या कारवार्इत पुणे पोलिसांनी आत्तापर्यंत ८६७ किलो ५४७ ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त केले आहे. त्याची किंमत एक हजार ६३९ कोटी १८ लाख २८ हजार ९०० रुपये आहे. गुन्हे शाखा एकच्या अमली पदार्थ विरोध पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

आरोपींना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी -

वैभव माने, अजय करोसिया आणि हैदर शेख यांच्या पोलिस कोठडीची मुदत गुरुवारी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींना या गुन्ह्यासाठी कोणी पैसै पुरविले तसेच त्यांनी राज्यात आणि देशात कोणत्या ठिकाणी मेफेड्रोनचा पुरवठा केला याचा तपास करण्यात येत आहे. त्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.

त्यामुळे आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील वर्षा आसलेकर यांनी केला. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एम. चौहान यांनी माने, करोसिया, हैदर आणि मकानदार यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर साबळे आणि भुजबळ यांना यापूर्वीच २९ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT