MP Supriya Sule Sakal
पुणे

Supriya Sule : 'कुछ तो गोलमाल है'; खासदार सुप्रिया सुळेंनी केला आरोप

राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कोणाचा यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असताना अजित पवार गटाकडून पक्ष व चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचे सांगत असतील.

सावता नवले

कुरकुंभ - राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष कोणाचा यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू असताना अजित पवार गटाकडून पक्ष व चिन्ह आम्हालाच मिळणार असल्याचे सांगत असतील. तसेच परिक्षेअगोदरच पास होणार, असं कोण सांगत असेल तर पेपर अगोदरच फुटला किंवा परिक्षेला बसण्याअगोदरच तुम्हाला ऐवढे मार्क पडणार अशी दिल्लीतील अदृश्य शक्ती त्यांच्या कानात येऊन सांगत असेल म्हणजे, 'कुछ तो गोलमाल है' असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

खासदार सुप्रिया सुळे शनिवारी (ता. ७) बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड तालुक्यातील भोळोबावाडी, कौठडी येथील गावभेट विकासकामांचे उद्घाटन व कुरकुंभ येथील आरोग्य केंद्राला भेट दिली. याप्रसंगी खासदार सुळे बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, दिल्लीतील अदृश्य शक्तीने महाराष्ट्रातील बाळ ठाकरे व शरद पवार या दोन मराठी माणसांनी उभा केलेला पक्ष फोडून व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंञी करून तीन मराठी माणसाला संपविण्याचे काम केले.

तसेच राज्यातील उद्योग बाहेर नेहून तरूणांचा रोजगार हिसकविण्याचे काम करून महाराष्ट्राला मागे नेण्याचे व मराठी माणसाला अपमानीत करण्याचे पाप वारंवार दिल्लीतील अदृश्य शक्तींकडून होत आहे. हीच अदृश्य शक्ती राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह कोणाला मिळणार हे अजित पवार गटाच्या कानात सांगत असेल.

हे म्हणजे परिक्षा देण्याअगोदरच मार्क किती पडणार असं सांगण आहे. निकाल अगोदरच सांगत आहे म्हणजे पेपर अगोदर फूटला किंवा कॉपी झाल्याची शक्यता आहे. आम्ही माञ कॉपी करून नाही तर मेरीटवर पास होणार असा विश्वास सुळे यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या, अजित पवार गटाचे सगळेच नेते शरद पवारांना दैवत आणि विठ्ठल म्हणतात. त्याच देवाला देव्हाऱ्यातून बाहेर काढतात ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती अशी टिका खा. सुळे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT