(सोलापूर आवृत्तीसाठी) फोटो ७१६४३ कौस्तुभ गावडे यांना प्रथम पसंतीचे मत द्या आमदार समाधान आवताडे ः मंगळवेढ्यात संस्था चालक, मुख्याध्यापक, शिक्षकांचा मेळावा मंगळवेढा, ता. २१ : ‘‘शिक्षकांचे प्रश्न समजून घेणारे आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित समस्यांची जाण असणारे शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या सारखे नेतृत्व विधानपरिषदेत पाठविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा. त्यांना प्रथम पसंतीचे मत द्या,’’ असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले. शिक्षकमित्र गावडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथे घेतलेल्या शैक्षणिक संस्था चालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचे मंगळवेढा तालुका पक्ष निरीक्षक कुणाल पाटील यांनी गावडे यांना प्रथम पसंतीचे मत देण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात प्रत्येक बूथप्रमुखाकडे मतदारांची जबाबदारी निश्चित करणे, क्लस्टरप्रमुखांच्या समन्वयातून मतदारांपर्यंत पोहोचणे आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी नियोजन करण्याबाबत आमदार आवताडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख जयप्रकाश पाटील, बोराळे येथील कवचाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भाजपचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष, पक्षाचे विविध पदाधिकारी, शिक्षक आघाडीचे नेते, तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.