पुणे

श्री संत दामाजी महाविद्यालयात "मराठी भाषा गौरव दिन " उत्साहात

CD

MGV26B15468
मंगळवेढा : येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा
पूजनप्रसंगी प्र. प्राचार्य औदुंबर जाधव उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड व इतर.

श्री संत दामाजी महाविद्यालयात
विद्यार्थ्यांच्या कवितांचे सादरीकरण
मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मंगळवेढा, ता. १ : येथील श्री संत दामाजी महाविद्यालयात कवी वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी कवितांचे सादरीकरण केले.
कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य औदुंबर जाधव यांच्या हस्ते, उपप्राचार्य प्रा. राजेंद्र गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. पी. एम. होनराव आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये मराठी विभागाचे प्रा. डॉ. राजकुमार पवार यांनी कवी कुसुमाग्रज यांचे जीवन व कार्य यांच्यावर प्रकाश टाकत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यापाठीमागचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे काव्यवाचन संपन्न झाले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त घेण्यात आलेल्या प्रश्नमंजूषा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक निकिता जाधव व हर्षदा इंगोले विभागून, द्वितीय क्रमांक आदिती सावंत, तृतीय क्रमांक निकिता बेंडे तर उत्तेजनार्थ क्रमांक गायत्री खांडेकर यांनी पटकाविला होता. त्यांच्या यायशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.राजकुमार पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पल्लवी रणझुंजारे यांनी तर स्मिता डोंगरे हिने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI in Army : आता 'फौजी' बनणार AI! सॅम ऑल्टमननी सैन्याशी केली हातमिळवणी, नेमकं तंत्रज्ञान काय? पाहा

Latest Marathi News Update : कांद्याला कवडीमोल भाव; विंचूरमध्ये स्वाभिमानीचा ‘रस्ता रोको’

Satara Robbery: कामावरून काढलं अन् टाकला दराेडा! अंगडिया कर्मचाऱ्याकडून लुटले ३२ लाखांचे दागिने, साताऱ्यातील दराेड्याप्रकरणी नेमकं काय घडलं..

IPL 2026 वर नवं संकट, स्पर्धा आधीच दोन दिवस पुढे ढकलावी लागतेय, त्यात आता रद्द होतेय की काय ही भीती... नेमकं काय कारण?

Shocking: दुर्दैवी! चालत्या स्कूल बसची फरशी अचानक तुटली; चिमुकली पडून चाकाखाली आली अन्...; भावासमोरच करूण अंत

SCROLL FOR NEXT