शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक sakal
पुणे

पुणे : ठेवीदारांच्या केवायसींची ‘सीए’कडून छाननी होणार

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक; ऑक्टोबरअखेर ठेवी परत मिळणे शक्य

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकांमधील (shivajirav bhosale cooprative bank) खातेदार-ठेवीदारांच्या केवायसी अर्ज आणि त्यांच्या रकमांबाबत ठेव विमा महामंडळाच्या (DICGC) सनदी लेखापालाकडून येत्या आठवड्यात छाननी सुरू होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास एक महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यानंतर ठेव विमा महामंडळाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या रकमा ऑक्टोबरअखेर परत मिळण्याची शक्यता आहे.

शिवाजीराव भोसले बॅंकेमधील गैरव्यवहारामुळे रिझर्व्ह बॅंकेने ही बॅंक अवसायनात काढली. ठेव विमा महामंडळाच्या नियमानुसार बॅंकेमधील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण आहे. ही रक्कम ठेवीदारांना परत करण्यासाठी त्यांच्याकडून केवायसी अर्ज भरून घेण्यात येत आहेत. बॅंकेकडे आत्तापर्यंत सुमारे १५ हजार खातेदार-ठेवीदारांचे केवायसी अर्ज प्राप्त झाले आहेत. याशिवाय काही ठेवीदारांचे केवायसी बॅंकेकडे आहेत. तसेच, केवायसी अर्ज यापुढेही बॅंकेत स्वीकारण्यात येणार आहेत. यापैकी बहुतांश अर्जांची ‘डीआयसीजीसी’कडून छाननी करण्यात येणार आहे. त्यामध्ये ठेवीदार, त्यांच्या ठेव रकमा, व्याजाची रक्कम अशा बाबी तपासण्यात येतील, अशी माहिती बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली.

व्याजासह पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळणार

‘सीए’कडून लेखापरीक्षण झाल्यानंतर ही माहिती ‘डीआयसीजीसी’ला पाठविण्यात येईल. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ठेवीदारांच्या रकमा त्यांच्या अन्य बॅंक खात्यात ऑनलाइन जमा करण्यात येतील. ठेवीदारांना व्याजासह जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळणार आहे.

केवायसी अर्जासोबत कागदपत्रे (झेरॉक्स)

ठेव रकमेची पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल, इतर बॅंकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड

बॅंकेची सद्यःस्थिती

  • शाखा १४

  • एकूण ठेवी ४३२ कोटी रुपये

  • ठेवीदार संख्या ७१ हजार ७७०

  • एक लाख रुपयांच्या आतील ठेवीदार : ६३ हजार ६५८

  • एक ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवीदार : ६ हजार ३००

  • पाच लाख रुपयांवरील ठेवीदार : १ हजार ८१२

ज्या ठेवीदारांनी केवायसीसह अर्ज अद्याप बॅंकेत जमा केलेले नाहीत, त्यांनी ते लवकर जमा करावेत. बॅंकेमार्फत आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आली आहे. येत्या ऑक्टोबरअखेर ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

- डॉ. आर. एस. धोंडकर, अवसायक, शिवाजीराव भोसले बॅंक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT