पुणे

सोलापूर- मजूर संस्थांना मिळणाऱ्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत वाढवा

CD

मजूर संस्थांच्या कामांची मर्यादा वाढवा

- लेबर फेडरेशनची मागणी

ॲग्रोवन वृत्तसेवा
सोलापूर : मजूर सहकारी संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांची आर्थिक मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून ३० लाख रुपये करण्यात यावी, या मुख्य मागणीसह संस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भेटून केली आहे.

लेबर फेडरेशन व मजूर संस्थांच्या विविध मागण्यांसाठी शिष्टमंडळाने आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या वेळी फेडरेशनचे अध्यक्ष शंकर चौगुले आणि माजी संचालक सरफराज काझी उपस्थित होते. मजूर सहकारी संस्थांना मिळणाऱ्या कामांची सध्याची १० लाखांची मर्यादा अपुरी असून ती ३० लाखांपर्यंत वाढवण्यात यावी या मुख्य मागणीसह संस्थांच्या प्रलंबित मागण्या सोडवून त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. मजूर संस्थांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करणे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकडे यात लक्ष वेधण्यात आले आहे. या निवेदनावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मजूर संस्थांच्या मागण्यांवर शासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन दिल्याची माहिती अध्यक्ष शंकर चौगुले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात आजपासून ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी लागू, राहुल गांधींच्या कार्यक्रमाचे काय? परवानगी मिळणार का?

IND vs SL 1st Test: रिषभ पंतने इतिहास रचला! असे 'शतक' झळकावणारा तो भारताचाच नव्हे, तर आशियातील पहिला फलंदाज ठरला

बाबो! प्राजक्ता माळीनं मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर, २८ व्या मजल्यावर आहे फ्लॅट

Marathi News Updates : राहुल गांधी पुण्यात येणार?, पुण्यात जमावबंदी लागू

Ganeshotsav 2026 : सुमारे 9 वर्षांनंतर दुर्मिळ योग! यंदा 10 ऐवजी तब्बल 12 दिवस रंगणार गणेशोत्सव; जाणून घ्या नेमके कारण

SCROLL FOR NEXT