पुणे

सध्याची कामगार चळवळ दुर्बळ : पवार

CD

पिंपरी, ता. २८ ः ‘‘आजच्या कामगार चळवळीत अनेक प्रवाह असल्यामुळे आपापसात वैचारिक लढाई सुरू असते. त्यामुळे कामगार चळवळ दुर्बळ झाली आहे. सत्याग्रही मार्गाने चळवळ चालवणे अवघड झाले आहे. समाजकारण, राजकारण यात सुसंस्कृतपणा हरवला आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजाला विधायक ऊर्जा देणाऱ्याच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,’’ असे प्रतिपादन माजी आमदार उल्हास पवार यांनी केले आहे.
पिंपरी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात एच.ए. कामगार लढ्याची यशोगाथा असलेल्या ‘गाथा संघर्षाची’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. कामगार नेते अरुण बोऱ्हाडे यांचे आत्मकथन असलेल्या आणि दादाभाऊ गावडे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘गाथा संघर्षाची’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर, मानव कांबळे, डॉ. कैलास कदम, माजी महापौर संजोग वाघेरे, दिलीप पवार, मारुती भापकर आदी उपस्थित होते. संयोजन संदीप तापकीर, डॉ. सीमा काळभोर, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, रामभाऊ सासवडे, दामोदर वहिले, तेजस्विनी देशमुख आदींनी केले. सूत्रसंचालन दिगंबर ढोकले यांनी केले. आभार डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Domestic Violence : चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने भररस्त्यात हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याची धमकी

Loni Kalbhor Crime: कोयता फिरवत दहशत माजवणारा तडीपार गुन्हेगार लोणी काळभोरमध्ये पोलिसांच्या सापळ्यात

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

SCROLL FOR NEXT