पुणे

कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन

CD

वेटणेत ‘कला, वाणिज्य’मार्फत
आजपासून श्रमसंस्कार शिबिर

पुसेगाव, ता. ५ : रयत शिक्षण संस्थेच्या येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागांतर्गत सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन वेटणे (ता. खटाव) येथे उद्या (मंगळवार) ते सोमवार (ता. १२) या कालावधीत करण्यात आले आहे.
शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे शाश्वत विकासासाठी तरुणाईचा सक्रिय सहभाग वाढविणे होय. त्याअंतर्गत जलसंधारण व पडीक जमिनीचे पुनर्वसन, आरोग्य दक्षता, ग्रामस्वच्छता, तसेच पर्यावरण संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. भोसले आणि रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या सात दिवसीय शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने, चर्चासत्रे, कार्यशाळा, तसेच प्रत्यक्ष श्रमदानाचे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन प्रा. डॉ. किरण कुंभार, प्रा. डॉ. हनुमंत निमसे यांनी केले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वेटणे ग्रामपंचायत, सरपंच व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : इंधन वाहतूक सुरळीत,पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी नाही

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT