mob 
पुणे

पुण्यातील या पुलाखाली परराज्यातील मजूर जमा झाले अन्‌... 

सकाळ वृत्तसेवा

वारजे (पुणे) : परराज्यात जाण्यासाठी वारजे उड्डाणपूल परिसरात शेकडो मजूर जमा झाले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, या भीतीने वारजे पोलिसांनी या मजुरांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावले. 

वारजे- माळवाडी, शिवणे, कर्वेनगर, उत्तमनगर परिसरातील शेकडो मजुरांनी सोमवारी सकाळी वारजे पुलाखाली गर्दी केली होती. या पुलाखाली आपल्या राज्यांत कसे जावे, यासंबंधीचे पत्रक लावण्यात आले होते. त्यामुळे या परप्रांतीय मजुरांना येथून आपल्या गावी जायची माहिती असेल, म्हणून त्यांनी पोलिसांना विचारणा करायला सुरवात केली. या वेळी मजुरांची संख्या वाढतच गेली. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत ही गर्दी पांगविली. 

पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असल्याने परप्रांतीय मजुरांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यांना त्यांच्या राज्यात जायला मिळावे, यासाठी हे मजूर एकत्र आले. वारजे पुलाखाली मजूरअड्डा भरत असतो. त्याच ठिकाणी गर्दी होत असल्याने आपल्याला गावी जायची माहिती मिळणार, ही बातमी या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येथे जवळपास 500 मजूर जमले होते. परिस्थिती आवाक्‍याबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी त्यांना सौम्य लाठीमार करून पांगविले. 

दरम्यान, दुपारनंतर येथील बराटे चाळीत परप्रांतीय मजुरांची यादी तयार करण्याचे काम वारजे गावठाणात सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती वारजे माळवाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी दिली. 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fertilizer Subsidy Hike : रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खतांच्या अनुदानात तब्बल ६४% वाढ, DAP ची गोणी कितीला मिळणार?

Oxford Naga Remains : १०० वर्षांनंतर पूर्वज परतले! इंग्रजांनी पळवून नेलेल्या ३९ मानवी कवट्या अखेर भारताला परत; लंडनमध्ये ऐतिहासिक सोहळा!

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! रत्नागिरी-रायगडमधील तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

IND A vs ENG A: पुणे-मुंबईत इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वनडे अन् टी२० सामन्यांसाठी भारतीय महिला अ संघाची घोषणा; अनुष्का शर्मा कर्णधार

SCROLL FOR NEXT