sasoon 
पुणे

ससूनवाल्यांना झालंय तरी काय, मृतदेह चार तास पडून

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : कोरोनाच्या चाचणीसाठी मृतदेहाचा एक्सरे काढण्याच्या नावाखाली ससून रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेमधील मृतदेह स्विकारण्याबाबत टोलवाटोलवी केली. त्यामुळे लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीतील एका अपघातग्रस्त अनोळखी इसमाचा मृतदेह चार तासांहून अधिक काळ शवविच्छेदनाशिवाय पडून राहिल्याचा गंभीर प्रकार शुक्रवारी (ता. ७) उघडकीस आला आहे. 

मृतदेहासोबत पोलिस कर्मचारी नसल्याचे कारण पुढे करत ससून रुग्णालय कर्मचाऱ्यांनी व ससून रुग्णालयात काम करणाऱ्या पोलिसांनी दौंड तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मृतदेह रुग्णालयाच्या दरवाजात चार तासांहून अधिक काळ पडून ठेवल्याची घटना बुधवारी (ता. ५) उघडकीस आली होता. त्यानंतर दोनच दिवसांच्या आत वरील प्रकार उघडकीस आला. त्यामुळे ससून रुग्णालयाचा बेशिस्त कारभार पुढे आला आहे. या ससूनवाल्यांना झालंय तरी काय...अशी म्हणण्याची वेळ आली आहे. 

पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात मणिलाल शिवाजी कोळपे (वय ४०, रा. बोरी भडक ता. दौंड) हे शेतकरी गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर स्थानिक पोलिस आले नसल्याचे सांगत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी व ससून रुग्णालयात काम करणाऱ्या पोलिसांनी सांगून कोळपे यांचा मृतदेह रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पडून ठेवला होता. हाच प्रकार शुक्रवारी पुन्हा एकदा घडला आहे. 

पुणे- सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका पस्तीस वर्षीय अनोळखी व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचा मृतदेह घेऊन लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सोमनाथ चितारे, त्यांचा एक सहकारी व रुग्णवाहिका चालक अण्णा बालगुडे हे ससून रुग्णालयात साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोचले. रुग्णवाहिका रुग्णालयात पोचताच सोमनाथ चितारे यांनी मृतदेह आणल्याची रितसर खबर ससून रुग्णालयाच्या चाळीस नंबर कांउटरवर दिली. तेथील अधिकाऱ्याने मृतदेह आल्याची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदन नेण्यास सांगितले. मात्र, शवविच्छेदनगृहातील कर्मचाऱ्यांनी मृतदेहाचा एक्सरे काढल्याशिवाय मृतदेह स्विकार नसल्याचा पवित्रा घेतला. यावर चितारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह पुन्हा रुग्णालयाच्या चाळीस नंबर कांउटरवर आणला. मात्र, त्यानंतर तब्बल चार तासांहून अधिक काळ एक्स रे कोण काढणार, या वादातून मृतदेह एक्स रेच्या खोलीत पडून होता. 

याबाबत सोमनाथ चितारे म्हणाले ी, मृतदेह चाळीस नंबर कांउटरवर आणला, त्यावेळीच कांउटरवरील अधिकाऱ्याने मृतदेह एक्सरे काढण्यासाठी पाठवायला हवा होता. मात्र, काउंटरवरील अधिकारी व ससून कर्मचारी यांच्यात एकवाक्यता नसल्याने चार तासांहून अधिक काळ मृतदेह पडून होता. मृतदेहाची हेळसांड होत असल्याबाबतची कल्पना कांउटरवरील अधिकाऱ्यांना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या चाचणीसाठी मृतदेहाचा एक्सरे काढण्याबाबत कोणाचाही नकार नाही. मात्र ही व्यवस्था सुधारण्याची मात्र गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT