पुणे

स्वच्छतागृहे झाली गोदामे, आरटीओ कार्यालयातील भिषण चित्र

सचिन बडे

पुणे : पुरुष आणि महिलांच्याही स्वच्छतागृहात फायलींनी भरलेल्या गोणपाटांच्या थप्प्या, टाकून दिलेल्या जुन्या खुर्च्या, मोडतोड झालेले फर्निचर, फुटलेले बेसिन अन्‌ तुटलेले भांडे... हे चित्र आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्वच्छतागृहाचे. परिवहन कार्यालयात एकूण आठ स्वच्छतागृह असून, त्यातील दोनच सध्या सुरू आहेत. अन्य सहा स्वच्छतागृहांमध्ये कार्यालयातील जुनी कागदपत्रे ठेवलेली आहेत. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दैनंदिन कामे ऑनलाइन करत कार्यालय अत्याधुनिक केल्याचा दावा केला आहे. मात्र, कार्यालयामध्ये पायाभूत सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला दिसत आहे. या कार्यालयात दररोज सुमारे दीड हजार नागरिक येतात. कर्मचाऱ्यांचीही संख्या सुमारे 100 हून अधिक आहे. त्या शिवाय आवारातील दलालांची संख्याही 200 हून अधिक आहे. सुमारे 1800 नागरिकांसाठी असलेली स्वच्छतागृहे सहजासहजी सापडत नाहीत. कोणत्याही स्वच्छतागृहाबाहेर साधा फलकदेखील नाही. मुख्य इमारतीत अनेक ठिकाणी अस्वच्छता आणि कचऱ्याचे ढीग आहेत. ज्या खोलीमधून कार्यालयात विद्युत प्रवाह पुरवला जातो, तेथेही कचऱ्याचा ढीग आहे. तेथे असणाऱ्या बॅटरी या कचऱ्यात ठेवलेल्या आहेत. 

अपंगाच्या सुविधा फक्त देखाव्यालाच 
अपंग नागरिकांना कार्यालयात प्रवेश करता यावा, यासाठी प्रशासनाने काही दिवसापूर्वी लाखो रुपये खर्च करून रॅंप तयार केला. कार्यालयासमोर विश्रांतीसाठी त्यांना एक खोलीही बांधली. मात्र, विश्रांतीसाठी बांधलेल्या खोलीला गेल्या अनेक महिन्यांपासून कुलूप आहे तर अपंगांच्या रॅंपला "पार्किंग'चा विळखा पडलेला असतो. 

कार्यालयातील बरेच स्वच्छतागृह बंद आहेत. सध्या महिलांसाठी एकच स्वच्छतागृह असून, त्याबाहेर बऱ्याच वेळा महिलांची रांग लागते. त्या स्वच्छता गृहामध्येही सुविधांचा अभाव आहे. त्यामध्ये जाण्याची इच्छा नसतानाही जावे लागते. 
- महिला कर्मचारी, आरटीओ 

कार्यालयात सध्या दोन स्वच्छतागृह सुरू असून, नवीन लोकांना सापडणार नाहीत, अशा ठिकाणी आहेत. स्वच्छतागृहाबाहेर नावाचा फलकही लावलेला नाही. अपंग नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. 
-दत्तात्रेय घुले 

सध्याच्या परिस्थितीबाबत मला कल्पना नाही. स्वच्छतागृहाची पाहणी करून, त्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करण्यात येतील. नागरिकांची गैरसोय होऊ नये, हाच आमचा उद्देश आहे. लवकरच सर्व स्वच्छतागृह नागरिकांना वापरण्यायोग्य करण्यात येतील. 
- बाबासाहेब आजरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरटीओ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2024: केएल राहुलला डच्चू, तर हार्दिक उपकर्णधार; वर्ल्ड कपसाठी कसं भारतीय संघात कसं आहे खेळाडूंचं संमिश्रण

Latest Marathi News Live Update : मनीष सिसोदियांना झटका! कोर्टानं दुसऱ्यांदा नाकारला नियमित जामीन

Dombivli News : डोंबिवलीत महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन; उमेदवार वैशाली दरेकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

Kiran Mane: उज्ज्वल निकम अन् एस.एम. मुश्रीफांच्या पुस्तकातले सिक्रेट्स; मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

Rajan Patil : मोहोळ तालुक्याचा दुष्काळ हटविण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला ज्यादा मताधिक्य देण्याचा निर्धार - राजन पाटील

SCROLL FOR NEXT