पुणे

मद्य धोरणाविरुद्धचे आंदोलन स्थगित : वांगचूक

CD

लेह, जम्मू,ता. ३० (पीटीआय)ः लडाखमधील नवीन मद्य धोरणाविरोधातील आंदोलन स्थगित करण्याची घोषणा पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी केली. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्याने व यासंदर्भातील करार अधिकृत करण्यासाठी एक आठवड्याची मुदत मागितल्याने वांगचूक यांनी हा निर्णय घेतला.
या मद्य धोरणाविरोधात लडाखमध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठवड्यात आंदोलन सुरू करण्यात आले होते. हे धोरण पूर्णपणे मागे घेऊन लडाखला ‘ड्राय’ केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वांगचूक यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, लडाख प्रशासनाने सर्व मागण्या मान्य करण्यास संमती दर्शविली असून यासंदर्भातील करारासाठी एक आठवड्याची मुदत मागितली आहे. त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशामध्ये महिलांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनावर महिलांनी दाखविलेल्या विश्वासाची कदर केली जाईल, अशी आशा आहे.
लडाख प्रशासनाच्या आश्वासनानंतर चार संघटनांनीही नियोजित धरणे आंदोलन मागे घेतले. लडाखच्या गृह विभागाने २९ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या एका पत्राद्वारे हे आश्वासन देण्यात आले. विशेष सचिव ताशी डोलमा यांच्या स्वाक्षरी असलेल्या या पत्रात मद्य धोरणाबाबत विविध संघटनांनी मांडलेले सर्व मुद्दे आणि शिफारसी तत्त्वतः स्वीकारण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Smile Day : खळखळून हसा! एक नोव्हेंबरला साजरा करा ‘स्माइल डे’; ‘सकाळ माध्यम समूहा’चा उपक्रम

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Marathi News Live Updates : रखडलेल्या तुर्भे उड्डाणपुलासाठी ठाकरे गटाचे रास्ता रोको

RailMadad: प्रवासात तुमच्या सामानाची चोरी झाल्यास रेल्वेकडून भरपाई मिळते का? जाणून घ्या काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT