Ladki Bahin Yojana Siddharth Shirole Esakal
पुणे

Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' उठली संसारावर! जाहिरातीवर महिलांच्या संमतीशिवाय फोटो, पतीने मागितला घटस्फोट; भाजप आमदाराविरोधात तक्रार

MLA Siddharth Shirole: या योजनेसाठी सध्या राज्यात महिलांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात लोकप्रतिनीधीही या योजनेचे जोरदार जाहिरात करताना दिसत आहे.

आशुतोष मसगौंडे

नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेसाठी सध्या राज्यात महिलांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. अशात लोकप्रतिनीधीही या योजनेचे जोरदार जाहिरात करताना दिसत आहे.

दरम्यान पुण्यातील शिवाजीनगरचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आपल्या मतदारसंघात या योजनेची माहिती देणारे फलक लावले आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे फोटो आहेत. यासह यावर दोन महिलांचेही फोटो आहेत.

अशात शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी जाहिरात फलकावर आपली संमती न घेता फोटो लावल्याचा आरोप दोन महिलांनी केला आहे. याचबरोबर याची तक्रार करण्यासाठी त्यांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठले होते.

दरम्यान हा सर्व प्रकार पुण्यातील शिवाजीनगरमधील आहे. येथील स्थानिक आमदारांनी लावलेल्या जाहीरात फलकांचा हा प्रकार भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगवाणे यांनी समोर आणला आहे.

दरम्यान हा प्रकार कळताच सिताराम गंगावणे यांनी लावलेल्या जाहिरात फलकासमोरच घोषणा देत त्या महिलांचे फोटो पोस्टरवरून हटवले.

दरम्यान भीम आर्मीचे पदाधिकारी सीताराम गंगावणे यांनी या सर्व प्रकाराविषयी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यांनी फेसबुकवर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत लिहिले की, "एकनाथ शिंदे यांची लाडकी बहिण योजना कशी फसवी आहे पाहा. या योजनेतील आत्या आणि भाचीचा जो फोटो आहे तो फोटो त्यांना न विचारता या आमदाराने छापला आहे."

त्यांनी पुढे लिहिले की, "त्या भगिनीला दोन मुली आहेत नवऱ्याला जसं याविषयी कळालं तसं त्याने, पत्नीला सोडचिठ्ठीची मागणी केली. आता दोन मुलांना घेऊन ही भगिनी जाणार कुठे?"

दरम्यान सीताराम गंगावणे यांनी असाही दावा केला की, या महिलांनी संबंधित प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस आयुक्तालय गाठले परंतु त्यांची तिथे कोणी दखल घेतली नाही. पण त्यांनी हस्तक्षेप करुत या महिलांना सहआयुक्तांकडे घेऊन गेले आणि तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT