wadapuri 
पुणे

लाखेवाडी येथील भवानी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी

आदम पठाण

वडापुरी - इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथील जय भवानी माता देवीचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या यात्रे निमित्त मंदिर परिसरात आकर्षक असे विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रा काळात मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

मंदिरापासून देवीच्या पालखीची ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली होती. या देवीच्या महोत्सावात पहिल्या दिवशी पहाटे देवीचा अभिषेक व महापुजा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव दिलीपराव ढोले व त्यांच्या पत्नी सहाय्यक विक्रीकर आयुक्त सुजाता ढोले या उभयांताच्या हस्ते करण्यात आली. यावेळी उदयसिंह पाटील, श्रीमंत ढोले व ग्रामस्थ उपस्थित होते.

यात्रेनिमित्त मोठ्या जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता यावेळी सोनाई कुस्ती केद्रांतील संतोष जगताप याने पुण्याचा भुषण शिवतारे या मल्याल्या चितपट करून जयभवानीगड केसरी किताब, चांदीची गदा, रोख रक्कम स्वरूपात बक्षीस पटकावले. यावेळी विशेष म्हणजे मुलींनी सुद्धा सहभाग घेतला होता. 

कराड येथील बॅन्ड पथकाने दिवसभर यात्रेला येणाऱ्या भाविकांचे जंगी स्वागत करण्यात येत होते. या यात्रेला देवीचा नवस फेडण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणावरुन हजारो मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी गावातील या परिसरातील सर्वच मान्यवर उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narhari Zirwal clerk action : नरहरी झिरवळ यांच्या खात्यातील लिपिकावर कारवाई; चौकशी अहवाल येईपर्यंत खाजगी सचिवांचा कार्यभार थांबवला

Deputy CM Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात; अध्यक्ष निवडीचा पेच कायम, जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा निर्णय

Latest Marathi News Live Update : मंत्रालयातील लाचखोरी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर द्यावं- सुप्रिया सुळे

'मुंबई-पुणे एक्सप्रेस वे'वर पुन्हा वाहतूक कोंडी; १३ किमी अंतरासाठी १ तास; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा

'ती सध्या काय करते' मध्ये छोटी तन्वी साकारणारी बालकलाकार आठवतेय का? आताची अवस्था पाहून बसेल धक्का, नेमकं झालंय तरी काय?

SCROLL FOR NEXT